Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

शिवसेनेच्या शिंदे गटाचे उद्या मुंबईत शक्तीप्रदर्शन – लोकसभा जागा राष्ट्रवादीकडुन परत घ्या – आक्रमक भुमिका, 3 हजार गाड्या जाणार

समय सारथी by समय सारथी
April 8, 2024
in महाराष्ट्र
0
0
SHARES
6
VIEWS

धाराशिव – समय सारथी 

शिवसेनेचा धाराशिव येथील शिंदे गट उद्या मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर शक्तीप्रदर्शन करणार आहे. धाराशिव येथील लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीला दिल्याने शिंदे गट आक्रमक झाला आहे. जागा राष्ट्रवादीला दिल्यानंतर शिवसेना पदाधिकारी यांनी आक्रमक होत बैठक घेतली. राजीनामा सत्रानंतर शिंदे गट 3 हजार गाड्या घेऊन मुंबईत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार असुन त्यांना शिवसैनिक यांच्या भावना व भुमिका सांगणार आहे. जागा शिवसेनेला परत घेण्याची मागणी करणार असुन जागा न मिळाल्यास निर्णायक भुमिका घेणार आहे. कदाचित बंडाची मोठी ठिणगी पडू शकते त्यामुळे उद्याची भेट महत्वाची आहे. 

आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत लोकसभेसाठी इच्छुक आहेत. भाजपमधुन राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारीला शिवसेना शिंदे गटाचा विरोध असुन राष्ट्रवादीचे काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पदाधिकारी यांच्या भावना तीव्र असल्या तरी मंत्री सावंत यांनी त्यांची भुमिका अद्याप उघड केली नाही.

वाशी येथील पदाधिकारी यांनी सामूहिक राजीनामे देत शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी फॉर्मची होळी आहे. धनंजय सावंत यांना उमेदवारी द्यावी अशी पदाधिकारी कार्यकर्ते याची मागणी व आक्रमक भुमिका घेतली आहे. भविष्यात जर महायुतीचा उमेदवार पराभूत झाला तर याला याला धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिक जबाबदार असणार नाहीत अशी भावना तालुक्यातील पदाधिकारी यांनी व्यक्त केल्या. त्याचबरोबर तानाजीराव सावंत हे जी भूमिका घेतील ती आम्हाला मान्य आहे व ते जो आदेश देतील तो आम्ही पाळणार असे सांगितले.

आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणुका लढलो आहोत त्यांच्या विरोधात प्रचार केला आहे. आता काय आम्ही राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काम करायचं का ? असा संतप्त सवाल उपस्थित करत धनंजय सावंत तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या. राष्ट्रवादीचे जिल्ह्यात पक्ष म्हणून तितके वलंय राहिले नाही, शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सांगितले तरी लोक मतदान करणार नाहीत, त्यामुळे अजुन वेळ गेली नाही असे सांगत जागा शिवसेनाच्या धनुष्यबाण याला सोडावी अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.

शिंदे गट अलिप्त – बॅनरवर सावंत यांचा फोटो नाही

धाराशिव येथे झालेल्या पक्षप्रवेशाच्या व उमेदवारी जाहीर झाल्याच्या जल्लोषापासुन शिवसेना शिंदे गट अलिप्तच राहिला. अर्चना पाटील यांना भाजपच्या ज्या प्रमुख पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या त्यात पालकमंत्री डॉ सावंत यांचा फोटो सुद्धा वापरला गेला नाही याबद्दल कार्यकर्ते यांनी उघड संताप यावेळी व्यक्त केला.आमदार राजेंद्र राऊत, नितीन काळे यांनी अर्चना पाटील यांना पक्षप्रवेशाच्या शुभेच्छा दिल्यात त्यात पालकमंत्री तानाजीराव सावंत यांचा फोटो वापरण्यात आला नाही. सावंत यांना पोस्टर स्थान देण्यात आले नाही त्यामुळेही शिवसेना पदाधिकारी यांनी तीव्र नाराजी बैठकीत व्यक्त केली. राष्ट्रवादी पक्षप्रवेशावेळी मंत्री तानाजीराव सावंत यांनी पाठ फिरवली तर शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले हे हजर होते मात्र नंतर ते सक्रीय झाले नसुन वाट पाहत आहेत. 

निवडणुक कार्यक्रम –

धाराशिव जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार असुन 12 एप्रिल रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल तर 19 एप्रिल अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असेल. 20 एप्रिल रोजी अर्जाची छानणी तर 22 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 7 मे ला मतदान असुन मतमोजणी 4 जुन रोजी असणार आहे.

Previous Post

शिवसेना आक्रमक – सामुहिक राजीनामे देत केली प्राथमिक सदस्य नोंदणी फॉर्मची होळी, लोकसभा उमेदवारीचा वाद

Next Post

पुष्पाताई पाटोदेकर यांचे निधन – आज 7 वाजता अंत्यसंस्कार 

Related Posts

महाराष्ट्र

प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे वक्तव्य

March 3, 2026
महाराष्ट्र

ड्रग्जचा पुन्हा सुळसुळाट – 20 पुड्या जप्त, धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई 

March 1, 2026
महाराष्ट्र

अमोल लाखेला अखेर अटक – 2 मकोका गुन्ह्यात फरार, निलेश घायवळ टोळीतील गुंड रडारवर 

February 28, 2026
महाराष्ट्र

घडामोडी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घेतली भेट, महायुतीत धनंजय सावंत

February 28, 2026
महाराष्ट्र

मुलीच्या छेडछाड प्रकरणी 4 वर्षे सक्तमजुरी – धाराशिव जिल्ह्यातील घटना, कोर्टाचे आदेश

February 27, 2026
महाराष्ट्र

आरोग्यात राजकारण – कॅथलॅब काम प्रलंबित, आमदार कैलास पाटीलांनी उठवला आवाज

February 27, 2026
Next Post

पुष्पाताई पाटोदेकर यांचे निधन - आज 7 वाजता अंत्यसंस्कार 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे वक्तव्य

March 3, 2026

ड्रग्जचा पुन्हा सुळसुळाट – 20 पुड्या जप्त, धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई 

March 1, 2026

अमोल लाखेला अखेर अटक – 2 मकोका गुन्ह्यात फरार, निलेश घायवळ टोळीतील गुंड रडारवर 

February 28, 2026
March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp