मुंबई – समय सारथी
धाराशिव लोकसभेची महायुतीची महत्वाची बैठक मुंबईत संपन्न झाली. पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीची रणनितीवर चर्चा होऊन व्युहरचना ठरली.
मुंबईत धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्या नेतृत्वात आगामी लोकसभा निवडणूक निमित्ताने अत्यंत महत्वाची महायुतीची बैठक व सविस्तर चर्चा झाली. यावेळी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील,बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत, भाजप जिल्हाध्यक्ष संताजीराजे चालुक्य -पाटील,राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार, नितीन काळे,अनिल खोचरे,बसवराज मंगरूळे,प्रविण पाठक,विनोद गपाट उपस्थित होती.