धाराशिव – समय सारथी
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनाथ सांजा गावातील मराठा बांधव आक्रमक झाले असुन बैलगाडी, दुचाकी घेऊन धाराशिव शहराकडे कूच झाले आहेत, आंदोलनकर्त्यांनी बेमुदत धाराशिव शहर बंदची घोषणा केली आहे. मराठा आरक्षण अंमलबजावणी व सरकारने जरांगे यांचे उपोषण मागे घ्यावे अशी मागणी केली आहे. सरकार विरोधी घोषणा देत तरुण दुकानें बंद करीत निघाले आहेत. धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे चक्काजाम आंदोलन करणार आहेत.