धाराशिव – समय सारथी
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यात बदल्याचा धमाका सुरु असुन पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक अश्या दर्जाच्या अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर नगर परिक्षेत्रात ह्या बदल्या झाल्या असुन विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ ज्ञानेश्वर चव्हाण यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.निवडणुका असल्याने ह्या बदल्या करण्यात आल्या असुन तात्काळ रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक असलेल्या उस्मान चाँद शेख यांची बीड तर तुळजापूर येथील पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांची जालना येथे बदली झाली आहे तर बीड जिल्ह्यातून बाळासाहेब पवार व छत्रपती संभाजी नगर येथील रवींद्र खांडेकर यांची बदली धाराशिव येथे झाली आहे.
सहायक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत व दिनकर गोरे यांची संभाजीनगर, सुरेश बनसोडे, मच्छिन्द्रनाथ शेंडगे व रघुनाथ जगताप यांची बीड जिल्ह्यात तर शांतीलाल चव्हाण यांची जालना जिल्ह्यात बदली झाली आहे.संदीप दहिफळे व विलास हजारे यांची बीड जिल्ह्यातून धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर येथून तात्या भालेराव, भागवत नागरगोजे, राम घाडगे,सचिन खटके, दिनेश जाधव हे धाराशिव जिल्ह्यात आले आहेत.
पोलिस उप निरीक्षक रवींद्रकुमार पवार व देवानंद साबळे यांची बीड येथे तर बीड हुन संतोष गीते व प्रताप गर्जे हे बदलून धाराशिव जिल्ह्यत आले आहेत.