धाराशिव – समय सारथी
तुळजाभवानी देवीचे पुरातन व मौल्यवान सोने-चांदीचे अलंकार चोरणाऱ्यावर अखेर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष डॉ सचिन ओम्बासे यांच्या आदेशाने 4 महंतासह 7 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महंत हमरोजीबुवा गुरु चिलोजी बुवा,चिलोजी बुवा गुरु हमरोजी बुवा,वाकोजीबुवा गुरु तुकोजी बुवा व महंत बजाजी बुवा गुरु वाकोजी बुवा सहायक या चार महंतासह मयत धार्मिक व्यवस्थापक अंबादास भोसले, सेवेदार पलंगे व अज्ञात अश्या 7 आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आहे.कलम 420, 406, 409, 381 व 34 आयपीसी नुसार तुळजापूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.तपास करण्यासाठी SIT ची पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केली स्थापना असुन DySP दर्जाचा अधिकारी तपास करणार आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार महादेव जानकर यांनी विधान परिषदेत अलंकार व दागिने गायब प्रकरणी दोषीवर गुन्हा नोंद करण्याची मागणी करीत प्रश्न उपस्थितीत केला होता त्यावर उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी शासनाचे याकडे लक्ष वेधले, जिल्हाधिकारी यांनी आदेश, तक्रार देऊनही गुन्हा नोंद होत झाला नसल्याचे सांगितले तसेच हिवाळी अधिवेशन संपण्यापुर्वी गुन्हे नोंद करण्याचे शासनास सांगितले.
उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या 16 सदस्य असलेल्या चौकशी समितीने केलेल्या तपासणीत चांदीचा मुकुट, त्रिशूल, प्रभावळ, धुपारती यासह अनेक चांदीच्या व सोन्याच्या वस्तू गायब असल्याचे समोर आले होते.
गेल्या अनेक वर्षापासून तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या पुरातन दागिन्याची मोजतात झाली नव्हती, ती मोजतात जिल्हाधिकारी यांनी करण्याचे आदेश दिले व त्यानंतर त्या मोजदादीमध्ये अनेक मौल्यवान अलंकार सोने-चांदीच्या वस्तू गहाळ असल्याचं समोर आले आहे. या गहाळ वस्तूची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले होते त्याप्रमाणे तहसीलदार सोमनाथ माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.