नळदुर्ग – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करण्याचे सत्र सुरूच असुन तुळजापूर तालुक्यातील जळकोटमध्ये एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मागील आठवड्यात ही दुसरी आत्महत्या आहे, मराठा आरक्षणासाठी जीव देणार आहे अशी सुसाईड नोट लिहून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 33 वर्षीय राहुल किसन जाधव याने आत्महत्या केली असुन त्याच्या खिशात सुसाईड नोट चिट्ठी सापडली आहे. राहुल याचा मराठा आंदोलनात सक्रीय सहभागी होता. तरुणांनो मराठा आरक्षणसाठी आत्महत्या करू नका, आरक्षणसाठी लढा असे आवाहन या निमित्ताने केले जात आहे. नळदुर्ग पोलिसात याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असुन पोलीस तपास करीत आहेत.
आत्महत्या चिट्ठी –
मी राहुल जाधव, मराठा आरक्षणासाठी जीव देणार आहे. एक मराठा लाख मराठा