आम्ही थांबावलं नाही तर त्याचं राम नाम सत्य झालं असतं
धाराशिव – समय सारथी
शिवसेना पक्ष फुट व सत्ता परिवर्तन वेळी आमदार कैलास पाटील यांच्याशी जीविताला होता, आम्ही थांबावलं नसतं तर त्यांचं राम नाम सत्य झालं असते असा गौप्यस्फ़ोट संजय शिरसाठ यांनी एका पॉडकास्ट दरम्यान केला.
शिरसाठ पॉडकास्टमध्ये म्हणाले की, पक्ष फुटीवेळी एकनाथ शिंदे यांचा फोन आला त्यावेळी आम्ही ठाणे येथे गेलो. तेथून सुरत येथे जात असताना एक टोल नाका आला, तिथे 3 ते 4 किमी लांब वाहनाची रांग होती. गाड्या सुरतकडे जाऊ नये यासाठी वाहनाच्या रांगा होत्या, तेव्हा शिंदे यांनी तिथल्या पोलिस अधीक्षक यांना फोन केला व विचारले की टोल नाक्यावर काय होत आहे. तेव्हा त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री यांचे आदेश आहेत. शिंदे म्हणाले की माझा आदेश माहिती आहे ना ? वाहतूक सुरळीत करा, तेव्हा ट्रॅफिक क्लिअर झाली आणि आम्ही गेलो.
ही एक वेबसिरीज सारखी घटना आहे. पाऊस पडत होता. एक आमदार परत जाण्यासाठी धडपडत होता, पुढचं काही सांगत नाही मात्र त्या दिवशी त्याचं राम नाम सत्य झाले असते. आम्ही थांबावलं म्हणुन त्यांना परत जाता आले असा गौप्यस्फ़ोट शिरसाठ यांनी एका पॉडकास्ट दरम्यान मुलाखती दरम्यान केला. आमदार कैलास पाटील हे सुरत येथून परत असल्याचे सर्वश्रुत असुन त्या अनुषंगाने शिरसाठ यांनी गोप्यस्फ़ोट केला.











