शिवसेना उबाठा गट आक्रमक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
धाराशिव – समय सारथी
राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लढलेल्या शासन आदेशाची ठाकरे गटाने होळी केली असुन लबाडाचे अवतन जेवल्याशिवाय खरं नाही अशी टॅगलाईन देत धाराशिव व कळंब येथे आंदोलन केले.
सरकारने दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा एकदा फसविले असुन गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी नुकसानीची मदत मिळालेली नाही. त्यातच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना थेट मदत करण्याऐवजी बोळवन करीत आहे. शासनाने फसवा आदेश काढला, त्यामुळे लबाडाचे आवतन जेवल्याशिवाय खरे नाही, याचं टॅगलाईन खाली आंदोलन केले असल्याचे ठाकरे सेनेच्या पदाधिकारी यांनी सांगितले. यावेळी राकेश सुर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी मोठया संख्याने उपस्थितीत होते.












