धाराशिव – समय सारथी
धाराशिव पंचायत समितीचे मुख्य प्रवेशद्वार भिंत बांधून बंद करण्यात येत असुन समता नगर ते मुख्य रस्ता जाणारा मार्ग सुद्धा भिंत बांधून बंद करण्यात येत आहे. एकंदरीत पंचायत समितीचे 3 ही बाजुने येणारे प्रवेशद्वार भिंत बांधून बंद करण्यात येत आहे. नियोजनबद्ध रित्या गोपनीयता पाळत कागदोपत्री प्रक्रिया केल्याचे कळते.
महालक्ष्मी सुट्टीच्या दिवशीचा मुहूर्त साधत रातोरात हे काम सुरु आहे. या कामासाठी कोणता ठराव घेतला, कोणत्या खात्यातून शासकीय निधी वापरणार, या कामाची निविदा कधी काढली व प्रक्रिया पार पडली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. प्रवेश कुठून दिला जाणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
समता नगर येथे जाणारा रस्ता बंद करण्याचे आदेश यापुर्वी जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी दिले होते त्यावरून बरेच वादंग उठले होते. हा रस्ता बंद करण्यासाठी भंगार गाड्यासह तारेचे कुंपण केले होते मात्र ते शिवसैनिकानी काढुन टाकले होते आता शेवटचा पर्याय म्हणुन थेट भिंत बांधली जात आहे.











