धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्याच्या विकासकामांना गती देण्यासह विविध योजनांच्या अंमलबजावणी आणि निधी खर्चाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरुवारी 17 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आली आहे. परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रतापराव इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृह,नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय परिसर,धाराशिव येथे होणार आहे.
बैठकीत प्रामुख्याने 1 मे 26 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तास तसेच त्या इतिवृत्ताच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहीच्या अनुपालनास मान्यता देण्याचा विषय विचारार्थ ठेवण्यात येणार आहे. जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 अंतर्गत सर्वसाधारण योजना,अनुसूचित जाती उपयोजना तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासींसाठीच्या उपयोजनेच्या ऑगस्ट 26 अखेर झालेल्या खर्चाचा सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात येणार आहे.
जिल्ह्याच्या विकासासाठी उपलब्ध निधीचा विनियोग आणि विविध योजनांवरील खर्चाची सद्यस्थिती या अनुषंगाने बैठकीत चर्चा होणार आहे.याशिवाय पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या परवानगीने आयत्या वेळेचे विषयही बैठकीत चर्चेसाठी घेण्यात येणार आहेत.











