धाराशिव – समय सारथी
एका 12 वर्षाच्या शाळकरी मुलीवर 65 वर्षाच्या वृद्धाने विनयभंग करीत अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना तुळजापूर शहरात घडली असुन जब्बार मेहबूब शेख या आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुलगी शाळेतून घरी जात असताना पाऊस आल्यानंतर आडोसा घेऊन थांबली असता हा प्रकार भरदिवसा घडल्याने खळबळ उडाली आहे. शाळकरी मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जब्बार याला पोलिसांनी अटक केली आहे.
एक मुलगी नेहमी प्रमाणे शाळेला तीच्या मैत्रीनीसोबत तुळजापूर येथील शाळेत जात होती मात्र घटनेच्या दिवशी तीच्या मैत्रिणी न आल्याने ती एकटीच शाळेत गेली. शाळा सुटल्यानंतर ती आयोध्या नगर येथील अंबिका वॉशिंग सेंटरच्या पाठीमागुन रस्त्याने एकटीच जात असताना अचानक पाऊस आला त्यामुळे ती एका दुकानाच्या छताखाली थांबली.
पावसात ती थांबली असताना एक वयोवृद्ध व्यक्ती तीच्या जवळ आला व हाताने इशारे करू लागला. त्यानंतर तीने मुलीच्या अंगाला विविध ठिकाणी स्पर्श करून विनयभंग करीत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने तेथून पळ काढत घरी गेली व सगळा प्रकार सांगितला. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून तुळजापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 74 व बाललैंगिक अत्याचार अधिनियम कलम 8 व 12 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एपीआय अन्नपूर्णा मस्के ह्या तपास करीत आहेत. घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.












