धाराशिव – समय सारथी
केंद्रीय मंत्री मंडळाचा विस्तार येत्या आठवड्यात होण्याची शक्यता असुन यात शिवसेनेला 2 मंत्री पद मिळणार असल्याची माहिती आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुरमू यांची भेट घेतली आहे.
शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्यासह ओमराजे निंबाळकर यांना मंत्री पदाची लॉटरी लागु शकते. केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री पदासाठी ओमराजे यांचा नंबर लागु शकतो त्यांच्यात व संजय जाधव यांच्यात रस्सीखेच असुन दीड दीड वर्षाचा फॉर्मुला ठरला आहे मात्र प्रथम संधी कोणाला हे पाहावे लागेल.
दरम्यान पार्थ अजित पवार यांचेही नाव राष्ट्रवादीच्या कोट्यातून चर्चेत आहे. माजी आरबीआय गव्हर्नर शशिकांत दास यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकते, काही नवीन चेहऱ्याना संधी मिळू शकते तर काहींना डचू मिळू शकतो.











