धाराशिव – समय सारथी
खासदार ओम राजे निंबाळकर यांनी शिवसेना उबाठा गटातुन शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. ओमराजे हे पत्रकार परिषदेत माहिती देत असताना जय भवानी जय शिवाजी, शिवसेनेचा वाघ आला’ च्या घोषणेत माजी पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांची एन्ट्री झाली अन ओमराजे यांनी पत्रकार परिषद तशीच सोडत सावंत यांच्या स्वागतासाठी गेले.
ओमराजे हे शिवसेना सोडून शिंदे गटात प्रवेश केल्याच्या घटनेत सावंत याचा मोठा वाटा होता, ते किंगमेकरच्या भूमिकेत होते, त्यांनी अखेर ओमराजे यांचा प्रवेश करून ‘ऑपरेशन टायगर’ मोहिम फत्ते झाल्याची घोषणा केली. सावंत यांनी शिवसेनेत 2 वेळेस ऑपरेशन टायगर यशस्वी करून दाखविले. पहिल्यांदा बंड केले तेव्हा सावंत यांची भुमिका महत्वाची होती आजही ते किंग मेकर ठरले.
7 वर्षात विकासाचा बॅकलॉग भरून काढणार शब्द व वचन दिले आहे, जास्त निधी देऊ, ओमराजे यांनी स्वार्थासाठी निर्णयघेतलेला नसुन जनतेसाठी घेतलेला आहे, त्यांची काम करण्याची तळमळ आहे. लोकांचे आश्रू पुसून काढणारा नेता असुन आगामी काळात अनेक कामे मार्गी लागतील असे सावंत म्हणाले.












