धाराशिव – समय सारथी
शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अखेर त्यांचा निर्णय जाहीर केला असुन ते शिवसेना उबाठा गट सोडून शिवसेना शिंदे गटात जाणार आहेत. कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी गोवर्धनवाडी येथील घरी झालेल्या चर्चेत व संवादानंतर त्यांनी त्यांचा निर्णय जाहीर केला. यावेळी कार्यकर्ते यांनी त्यांच्या भावना मोकळ्या करून दिल्या, त्यात त्यांनी राणाजगजीतसिंह पाटील व परिवारावर टीका केली, विकास कामे अडवली जातात असे सांगितले.












