धाराशिव – समय सारथी
3 जुन 2006 ला कै पवनराजे व समद काझी यांची निर्घृण हत्या केली, त्या दिवसापासुन आम्ही संघर्ष करीत आहोत. डॉ पाटील यांच्या दबावामुळे याचा तपास राज्य पोलिस व्यवस्थित करीत नसल्याने आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, त्यानंतर सीबीआयकडे तपास गेला. 20 जुनला जो निकाल दिला त्यात कोर्ट राजकीय वैमनस्य मान्य करते, हत्येचा उद्देश मोटिव्ह मान्य करते व सर्व आरोपीची निर्दोष मुक्तता करते, मग पवनराजे यांना कोण हत्या कोणी केली याचे उत्तर मिळाले नाही हे अतिशय दुर्दैवी आहे.
निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील करणार असुन निकालातील त्रुटी मांडणार आहोत. ज्या निकालासाठी 20 वर्ष आम्ही लढत आहोत त्यासाठी पुन्हा उच्च न्यायालयात जाणार असुन ते कोर्ट आमच्या बाजुने निर्णय देईल अशी अपेक्षा आहे. कुटुंबातील प्रमुख नसल्याने काय हाल व दुःख होते ते आम्ही रोज भोगत आहोत.
ज्या लोकांनी ज्या कारणासाठी हत्या केली त्यांचा हेतू कधीही साध्य होऊ देणार नाही. राजकीय विरोधकाची हत्या केली तरी तो संपत नसतो, तो तयार होत असतो त्यामुळे मी राजकारणात आलो.ओमराजे काय काम करतो ते लोकांनी पहिले आहे, त्यामुळे सोशल मीडियावर चुकीचे चालु आहे.
सगळ्यांशी चर्चा करून मत जाणून निर्णय घेणार आहे, माझा मोबाईल नंबर सर्वसामान्य लोकांकडे आहे, शेवटच्या घटकापर्यंत माझा संपर्क आहे त्यांना अडचण आली की ते फोन करतात. माझा फोन बंद नाही.
धाराशिव लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी तालुका निहाय बैठक घेऊन संवाद साधला व त्यांची मते जाणून घेतली. ओमराजे व डॉ जयप्रकाश राजे यांनी वडील कै पवनराजे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले व त्यानंतर बैठक घेतली.












