धाराशिव – समय सारथी
समद काझी यांची हत्या झाली त्यावेळी मी दीड वर्षाचा होता, त्यामुळे काही कळत नव्हते पण नंतरच्या काळात अनेक कष्ट सोसले, त्यांच्या आठवणी आई आजही सांगते अशी प्रतिक्रिया समद काझी यांच्या मुलाने दिली. लहान मुलांच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हरवल्याने त्यांचा संभाळ करणेसह अन्य जबाबदाऱ्या होत्या अनेक कष्ट सोसले, समद यांचा काही दोष नसताना त्यांची हत्या करण्यात आली. दोषींना शिक्षा देऊन आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती काझी परिवाराने केली. 20 जुन रोजी पवनराजे हत्याकांडाचा निकाल लागणार आहे.
हत्याकांडानंतर निंबाळकर परिवाराला रस्त्यावर उतरून व कायदेशीर संघर्ष करावा लागला. डॉ जयराजे निंबाळकर यांनी सर्व काही सोडून गेली 17 वर्ष पोलिस, कोर्ट कचेरीत घालवली तर इंजिनिअरिंगचे शिक्षण अर्धवट सोडून ओमराजे निंबाळकर हे राजकारणात गेले, त्यानंतर त्यांचा राजकीय उदय झाला. हत्याकांड नंतर समद काझी परिवारातील 2 मुले व 1 मुलगी पोरके झाली, कालातराने शिक्षणासाठी ते लातुर येथे स्थायिक झाले. काझी यांची दोन्ही मुले बीएससी झाली असुन एक मुलगी बीटेक झाली आहे. वडिलांच्या आठवणीने आजही निंबाळकर व काझी परिवाराचा कंठ दाठुन येतो.
मृत्युदंड द्या, दुर्मिळातील दुर्मिळ कृत्य – शांत डोक्याने दुहेरी हत्या
डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 आरोपीनी शांत डोक्याने 16 महिने रेकी करून नियोजनबद्ध कट रचून हे दुहेरी हत्याकांड केले, संशयाच्या पलीकडे जाऊन सर्व पुरावे असल्याने व आरोप सिद्ध होत असल्याने आरोपीना मृत्यु दंडाची शिक्षा करावी अशी विनंती आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांनी कोर्टास केली आहे. त्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टातील माची सिंग व इतर विरुद्ध पंजाब सरकारच्या 20 जुलै 1983 च्या निकालाचा दाखला दिला आहे. थंड डोक्याने कट रचणे, एका पेक्षा जास्त व्यक्तींचा खुन करणे हे दुर्मिळातील दुर्मिळ घटना आहे. खासदार ओमराजे व डॉ जयप्रकाश राजे यांनी न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्याचे सांगितले. सीबीआय तपासात खुन कोण व का केला हे समोर आले आहे.
25 लाखांची सुपारीची अशी झाली वाटणी –
3 जुन 2006 रोजी पवनराजे व समद काझी यांच्या हत्येनंतर पारसमल जैन व पिंटू सिंग 4 जूनला राजस्थानला गेले. दुसऱ्या दिवशी जैन याने शुक्ला याला फोन करून पैशाची मागणी केली, त्यावेळी तो म्हणाला की डॉ पाटील हे गावी आहेत. 15 दिवसांनी सतीश मंदाडे व मोहन शुक्ला हे दोघे डॉ पद्मसिंह पाटील यांच्या कुलाबा येथील घरी गेले व तिथून त्यांच्याकडून पैसे घेऊन आले. शुक्ला याने 25 लाख जैन याला दिले. त्यातील 5 लाख रुपये राजस्थान येथील घरी ठेवून 20 लाख घेऊन उत्तर प्रदेशला गेला, तिथे 20 लाख कैलाश यादव याला दिले. त्याने 5 लाख स्वतःला ठेवून 15 लाख छोटे पांडे यांच्याकडे दिले. 15 लाख पैकी 7 लाख पांडे याने स्वतःला ठेवले व उर्वरित 8 लाख पैकी प्रत्येकी 4 लाख तिवारी व पिंटू सिंग याला दिले. अश्या प्रकारे आरोपीनी 25 लाखांच्या सुपारीची ‘वाटणी’ केली.
9 आरोपी विरोधात दोषारोप पत्र –
20 ऑगस्ट 2009 रोजी सीबीआयने 5 हजार पानांचे दोषारोप पत्र दाखल केले. माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, पारसमल जैन बादला, शुटर दिनेश तिवारी, मुंबईतील नगरसेवक मोहन शुक्ला, लातुर येथील सतीश मंदाडे, शुटर पिंटू सिंग, उत्तर प्रदेशमधील बसपा पक्षाचा नेता कैलास यादव, माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशिकांत कुलकर्णी व छोटे पांडे हे दुहेरी हत्याकांडात आरोपी आहेत.
दुहेरी हत्याकांडातील माफीचा साक्षीदार बनलेला आरोपी पारसमल जैनला 14 वर्षांनी व शुटर दिनेश तिवारी याला 25 मे 2009 अटक करण्यात आली तर पिंटू सिंग याला 15 जुन 2009 साली अटक करण्यात आली. या 2 आरोपींना तब्बल 16 वर्षानंतर तर डॉ पाटील यांना साडे 3 महिन्यात जामीन मिळाला, त्यांना 6 जुन 2009 रोजी अटक करण्यात आली, 25 सप्टेंबर 2009 रोजी अलिबाग कोर्टाने डॉ पाटील यांना 2 लाख रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केला. सर्व 9 आरोपी सध्या जामिनावर आहेत. त्यातील शुटर महात्मा उर्फ पिंटू सिंग चौधरी दुसऱ्या एका गुन्ह्यात बिहार राज्यातील सिवान जेलमध्ये असुन त्याला निकालावेळी समक्ष हजर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.











