धाराशिव – समय सारथी
शिवसेना उबाठा गटाचे 6 खासदार फुटून त्यांनी वेगळा गट स्थापन केला. धाराशिवचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर हे ऑपरेशन टायगरचा भाग असुन ते शिंदे गटात जाणार असल्याचे निश्चित आहे. कै पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा निकाल 20 जुन रोजी लागणार असुन त्या निकालानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडणार आहेत, खासदार ओमराजे निंबाळकर हे कदाचित निकालानंतर भुमिका स्पष्ट व जाहीर करू शकतात अशी सुत्रांची माहिती आहे.
ओमराजे हे शिंदे गटात जाणार असले तरी आमदार कैलास पाटील हे मात्र ठाकरे गटातच राहणार आहेत. आमदार पाटील ठाकरे गटात राहून ‘खिंड’ लढवणार आहेत.“बाकी काहीही असो, आपण मात्र शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासोबतच आहोत. काल, आज आणि उद्याही आम्ही ठाकरेंसोबतच राहणार अशी भुमिका स्पष्ट केली. ओमराजे यांच्या संभाव्य प्रवेश व इतर बाबीवर त्यांनी बोलण्यास टाळले.
आमदार पाटील हातात मशाल घेऊन विरोधकाची भुमिका बजावतील. पहिल्या वेळी शिवसेना फुटली त्यावेळीही ते ठाकरे यांच्या सोबत होते, दुसऱ्यांदाही ते ठाकरे यांच्या सोबत असतील.











