धाराशिव – समय सारथी
धाराशिव बीड लातूर विधानपरिषद महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी शिवसेना नेते, माजी आरोग्य मंत्री व आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांची भेट घेतली. भेटी दरम्यान विविध सामाजिक व राजकीय विषयांवर चर्चा झाली. नुकत्याच होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी आमदार सावंत यांनी पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी धाराशिव जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ताअण्णा साळुंके,रामचंद्र घोगरे सर, जिल्हा परिषद माजी गटनेते प्रकाश आष्टे, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.











