धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील शेकापूर येथे असाध्य आजार बरे करण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला असुन एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भुतबाधा व रोग बरे करण्याच्या नावाखाली हा प्रकार सर्रास सुरु असुन सोलापूर, धाराशिव व बीड जिल्ह्यातील नागरिकांचा इथे लोंढा सुरु आहे.
शेकापूर या गावात दर शनिवारी एका भोंदू बाबाचा दरबार भरतो. येशूची प्रार्थना करायची असे सांगून तो आधार घ्यायचा, याद्वारे अंगातील भूतबाधा, दैवी कोप किंवा मोठे आजार कायमचे दूर केले जातात, असा दावा येथे केला जातो. 10 रुपयांचे खोबरेल तेल आणि एका बाटलीतील पाणी पाजून लोकांची दिशाभूल केली जात आहे. व्हिडिओमध्ये भोंदू बाबा महिला आणि पुरुषांना संमोहित करताना दिसत आहे. याच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.











