Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

पवनराजे दुहेरी हत्याकांड – 16 जुनला निकालाची तारीख, डॉ पाटलांसह सर्व आरोपीना हजर राहण्याचे आदेश

समय सारथी by समय सारथी
June 14, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
713
VIEWS

धाराशिव – समय सारथी

2006 साली राज्यभर गाजलेल्या कै पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडीचा चालक समद काझी दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल 16 जुनला लागणार आहे. 14 मे रोजीच्या सुनावणी वेळी मुख्य संशयित आरोपी माजी गृहमंत्री डॉ पदमसिंह पाटील व मोहन शुक्ला हे 2 जण वैद्यकीय कारण सांगत गैरहजर होते त्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली. कोर्टाने त्यांचा हजेरी माफीचा अर्ज मंजुर करताना यापुढे संधी मिळणार नाही असे सांगितल्याने तारीख पे तारीखचा सिलसिला संपण्याची शक्यता आहे. रक्तरंजित हत्याकांडाचा तब्बल 20 वर्षानंतर फैसला होणार आहे. 2009 साली हत्याकांड उघड होऊन आरोपीना अटक झाल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणाची दशा आणि दिशा बदलली होती त्याचप्रमाणे निकालानंतर अनेक घडामोडी घडू शकतात.

मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस आर नावंदर यांच्या कोर्टात सुनावणी सुरु आहे. पारसमल जैन बादला हा माफीचा साक्षीदार असुन त्याच्या कबुली जबाब भोवती हे संपुर्ण प्रकरण आहे. राजकीय कारकीर्द व अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याने माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे व मोहन शुक्ला यांनी कट रचत 25 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या केल्याचा ठपका सीबीआयने दोषारोपपत्रात ठेवला आहे.

पवनराजे यांची हत्या करण्यासाठी पारसमलने फेब्रुवारी 2005 मध्ये लातुर येथे जाऊन त्यांच्या घरी रेकी केली त्यानंतर तो धाराशिवला आला मात्र डाव फसल्याने तब्बल 16 महिने कट रचून, पाळत ठेवून 3 जुन 2006 रोजी पवनराजे निंबाळकर यांची कळंबोली येथे भरदिवसा गोळ्या घालुन हत्या करण्यात आली. हत्याकांड नंतर 3 वर्षांनी 6 जुन 2009 रोजी माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांना खासदार पदावर असताना सीबीआयने अटक केली, त्यानंतर त्यांचे राष्ट्रवादीतुन निलंबन झाले. महाराष्ट्र पोलिस, सीआयडी व त्यानंतर सीबीआय अश्या 3 तपास यंत्रणानी याचा तपास केला असुन सुनावणी दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह 128 साक्षीदार तपासण्यात आले.

माजी गृहमंत्री तथा माजी खासदार डॉ पद्मसिंह पाटील, पारसमल जैन बादला, शुटर दिनेश तिवारी, मुंबईतील नगरसेवक मोहन शुक्ला, लातुर येथील सतीश मंदाडे, शुटर पिंटू सिंग, उत्तर प्रदेशमधील बसपा पक्षाचा नेता कैलास यादव, माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशिकांत कुलकर्णी व छोटे पांडे हे 9 जण दुहेरी हत्याकांडात संशयित आरोपी आहेत. सीबीआयचे तत्कालीन वरिष्ठ अधिकारी ऋषीराज सिंग, पोलीस अधीक्षक अमिताभ ठाकुर व त्यांच्या टीमची भुमिका महत्वाची राहिली. पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांच्या याचिकेनंतर हे प्रकरण अंतीम टप्प्यात आले, डॉ जय राजे निंबाळकर हे यांनी याचा पाठपुरावा केला, ऍड पी एम गवाड हे बाजु मांडत आहेत.

हत्याकांडातील माफीचा साक्षीदार पारसमल जैनला 14 वर्षांनी व शुटर दिनेश तिवारी आणि पिंटू सिंग या 2 आरोपींना तब्बल 16 वर्षानंतर तर डॉ पाटील यांना साडे 3 महिन्यात जामीन मिळाला होता. सर्व आरोपी जामिनावर बाहेर असुन 16 जुन रोजी त्यांना कोर्टात निकालासाठी हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत, सर्व आरोपी हजर राहिल्यास त्या दिवशी कोर्ट आपला निर्णय जाहीर करू शकते. तेरणा ट्रस्ट, तेरणा कारखाना, 2004 ची विधानसभा निवडणुकीसह अन्य मुद्दे सुनावणी दरम्यान मांडण्यात आले.

दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येची सुपारी व कट रचल्याच्या प्रकरणात लातुर कोर्टात 29 जुन रोजी सुनावणी होणार असुन मंदाडे याच्या विरोधात वॉरंट काढले आहे. गेली 17 वर्षांपासून या प्रकरणात काहीही झालेले नाही. 29 सप्टेंबर 2009 रोजी हत्येची सुपारी व कट रचल्याचा गुन्हा अण्णा हजारे यांनी लातुर एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल केला त्यानंतर डॉ जय राजे यांनी माहितीच्या अधिकारात तपासाची माहिती मागितली. तब्बल 10 वर्षाने सीआयडीने राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, मोहन अनंत शुक्ला व सतीश रानबा मंदाडे यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले. 2022 पासुन चार्ज फ्रेम ( आरोप निश्चिती प्रक्रिया ) न झाल्याने प्रत्यक्ष सुनावणीला ( साक्षी व पुरावे प्रक्रिया) सुरुवात झालेली नाही. 4 वर्षापासुन चार्ज फ्रेम झाला नसुन तारीख पे तारीखचा सिलसिला सुरु आहे.

Previous Post

भोंदू बाबाचा दरबार, येशूच्या प्रार्थनेचा सहारा – 10 रुपयांचे खोबरेल तेल अन पाणी, फसवणुक, कारवाईची मागणी

Next Post

मुंडेची बदली केली तर मी सरकारच्या मागे लागेल – मनोज जरांगेंचा इशारा, त्यांना काम करू द्या

Related Posts

महाराष्ट्र

तुळजापूर हवाई धावपट्टी जागेची पाहणी – भारतीय विमान प्राधिकरणाकाकडून विमानतळाचीही भेट

August 22, 2026
महाराष्ट्र

आमचं ठरलंय – नगराध्यक्ष विनोद गंगणे यांची एक पोस्ट अन चर्चेला उधाण

August 22, 2026
महाराष्ट्र

ड्रग्ज तस्करी – 1 आरोपीला पोलीस कोठडी, नगरसेवक मिर्झाला आज अटक करणार, टीम रवाना

August 19, 2026
महाराष्ट्र

Breaking – कळंब ड्रग्ज तस्करीत नगरसेवक मिर्झा आरोपी, परभणी कोर्टाकडुन ट्रान्झिट रिमांड मंजुर

August 18, 2026
महाराष्ट्र

ड्रग्ज तस्करी – 1 आरोपी जेलमध्ये, 1 वाढीव पोलिस कोठडी तर 1 निष्पन्न, कमर्शीयल क्षमता

August 18, 2026
महाराष्ट्र

पालक की ‘रिसॉर्ट मंत्री’ ? ‘विकास’ नेमका कुणासाठी ? बुलडोझर – प्रदेशाध्यक्ष सपकाळांची सरनाईकांवर टीका

August 17, 2026
Next Post

मुंडेची बदली केली तर मी सरकारच्या मागे लागेल - मनोज जरांगेंचा इशारा, त्यांना काम करू द्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

तुळजापूर हवाई धावपट्टी जागेची पाहणी – भारतीय विमान प्राधिकरणाकाकडून विमानतळाचीही भेट

August 22, 2026

आमचं ठरलंय – नगराध्यक्ष विनोद गंगणे यांची एक पोस्ट अन चर्चेला उधाण

August 22, 2026

ड्रग्ज तस्करी – 1 आरोपीला पोलीस कोठडी, नगरसेवक मिर्झाला आज अटक करणार, टीम रवाना

August 19, 2026
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp