धाराशिव – समय सारथी
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत रविवारी सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे. ऑपरेशन टायगर व तृणमुल काँग्रेस पक्ष फुटीच्या धर्तीवर ही बैठक आयोजित केल्याचे बोलले जात आहे. मुंबईतील या बैठकीला खासदार ओमराजे हे अनुपस्थितीत राहणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. मुलगा आजारी असल्याने वैद्यकीय उपचारासाठी ओमराजे हे पुण्यात असुन तशी कल्पना त्यांनी ठाकरे यांना दिली आहे. दानवे यांच्या धाराशिव येथील बैठकीला सुद्धा ओमराजे याचं कारणामुळे हजर नसल्याचे सांगितले जात आहे.
उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार म्हणुन खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्याकडे पहिले जाते. ओमराजे हे अंबादास दानवे यांनी बोलावलेल्या बैठकीला अनुपस्थितीत असल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. ओमराजे यांनी मात्र पक्षांतर व इतर चर्चेचे खंडण केले असुन वैद्यकीय कारण असल्याचे सांगितले.












