Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

अन्नदाता अन ‘ऊर्जादाता’ – परकीय चलनाचा संरक्षक, कचऱ्यापासुन बायोडिझेल, शेतकरी होणार समृद्ध – आमदार राणाजगजीतसिंह पाटील

समय सारथी by समय सारथी
June 13, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
294
VIEWS

धाराशिव – समय सारथी

शेतीमधील पीक काढणीनंतर उरणारे काडी, तुराट्या, धसकटे ,भुस्कट आणि अन्य अवशेषांना आता नवी किंमत प्राप्त होत आहे. शेतकऱ्यांसाठी अनेकदा ओझे ठरणारा आणि जाळून टाकला जाणारा हा कचरा भविष्यात उत्पन्नाचे ठोस साधन ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर शेतातील काडी कचऱ्यापासून तयार करण्यात आलेल्या नवीकरणीय डिझेलचा चारचाकी वाहनात वापर करून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यशस्वी ड्रायव्हिंग टेस्ट घेतली आहे. या तंत्रज्ञानामुळे आता देशातील शेतकरी केवळ ‘अन्नदाता’ न राहता ‘ऊर्जादाता’ व ‘परकीय चलनाचा संरक्षक’ म्हणून नवी ओळख निर्माण करणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, मूल्यवर्धित शेतीला चालना देणे आणि देशाला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनविण्याचा संकल्प केला आहे. कृषी अवशेषांपासून तयार होणारे नवीकरणीय डिझेल हा त्या संकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. सध्या महाराष्ट्रातील ग्रीनज्यूल्स या कंपनीसोबत या नाविन्यपूर्ण विषयावर आपण काम सुरू केले आहे. शेतीतील टाकाऊ अवशेष व कचऱ्यापासून तयार केलेले नवीकरणीय डिझेल वापराच्या दृष्टीने पारंपरिक डिझेलइतकेच प्रभावी असल्याचे प्राथमिक चाचण्यांमधून स्पष्ट झाले आहे. शेतातील इतर टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात आलेले हे नवीकरणीय डिझेल वाहनात वापरल्यावर गाडीचा परफॉर्मन्स अत्यंत समाधानकारक राहिला. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना कृषी अवशेष विक्रीतून अतिरिक्त उत्पन्न मिळण्याचा मार्ग खुला होऊ शकतो असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

जागतिक स्तरावर ऊर्जा सुरक्षेचे प्रश्न, इंधनाच्या वाढत्या किमती आणि परकीय चलनावरील ताण ही गंभीर आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत देशांतर्गत उपलब्ध असलेल्या शेतीमधील अवशेष व कचऱ्यापासून इंधननिर्मिती झाल्यास परदेशी इंधनावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर वायू प्रदूषण कमी करण्यासाठीही नवीकरणीय डिझेल हा प्रभावी पर्याय ठरणार आहे. आजच्या घडीला शेतातील कचरा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या अनेक बाबी उद्या उत्पन्नाचा सक्षम स्रोत होऊ शकतो. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि देशाला ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी बनविणे, या तिन्ही उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी या क्षेत्रातील संशोधन आणि उद्योगांची महत्त्वाची भूमिका राहणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

शेतकरी आता अन्नदाता, उर्जादाता न राहता परकीय चलन वाचवणारा महत्वाचा दुवा ठरणार आहे.राज्यात दरवर्षी 30 % कांदा सडतो, तसेच मोठ्या प्रमाणात उत्पादित झालेले अनेक फळे पिके कमी किंमत मिळते म्हणून शेतकरी टाकून देतात,बाजार समितीच्या आवारात देखील भाजीपाल्याचे अवशेष शिल्लक राहतात.कृषी अवशेषांपासून इंधननिर्मिती केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार असून मोदींजींच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या प्रयत्नात महत्वाचे पाऊल ठरणार आहे.हा प्रयोग ही केवळ तांत्रिक नवकल्पना नसून, शेतकरी, पर्यावरण आणि देशाच्या आर्थिक स्वावलंबनाला जोडणारा नवा विकासमार्ग आहे.

देशात दरवर्षी 62 दशलक्ष मेट्रिक टन कृषी अवशेष उपलब्ध होतात, ज्यातून गॅस बनू शकतो. सध्या आपण या क्षमतेचा केवळ 1 टक्काच वापर करत आहोत. केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत देशभरात 5000 सीबीजी प्रकल्प उभारण्याची योजना आहे. हे उद्दिष्ट पूर्ण झाल्यास भारत इंधनाच्या बाबतीत पूर्णपणे स्वावलंबी होईल,” असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे. या अनुषंगाने केंद्र आणि राज्य सरकारचे उचित धोरण तयार व्हावे तसेच पुढील काळात याची मोठ्या प्रमाणात निर्मिती व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Previous Post

2 आरोपी फरार, ड्रग्ज तस्करी – ठाकूरचा खुलेआम वावर तर गोळे हाताशी आलेला निसटला – दोषारोप दाखल

Next Post

विवाह रॅकेट, महिन्यात नववधु फरार – तेलंगणातील गँगने फसवले, 17 तोळे सोने लंपास, 50 लाखांची खंडणी

Related Posts

महाराष्ट्र

तुळजापूर येथील हत्याकांड प्रकरणात महंत शिंदे महाराज यांना दिलासा – छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात अटकपुर्व जामीन मंजुर

November 27, 2026
महाराष्ट्र

हत्येचा कट ? सत्ता परिवर्तन, आमदार कैलास पाटीलांच्या जीवाला होता धोका, संजय शिरसाठांचा गोप्यस्फ़ोट

November 23, 2026
महाराष्ट्र

अहवाल सादर, कारवाईकडे लक्ष – नगर परिषद घोटाळा, यलगट्टेसह अन्य लोकांवर कारवाईची टांगती तलवार

November 16, 2026
महाराष्ट्र

कुलूप – अग्नीतांडव नंतर सुद्धा आपत्ती व्यवस्थान विभागाचे कार्यालय बंद, असंवेदनशिलता

November 10, 2026
महाराष्ट्र

हद्दपारी – रोचकरी पिता पुत्राचा प्रस्ताव, देवानंद यांच्यावर 37 तर गणेशवर 9 गंभीर गुन्ह्यांची नोंद 

November 8, 2026
महाराष्ट्र

ड्रग्ज तस्करी, रॅली काढणे भोवले – नगरसेवक मिर्झासह 40 जणांवर गुन्हा नोंद, तिघांवर 110 ची कारवाई

November 7, 2026
Next Post

विवाह रॅकेट, महिन्यात नववधु फरार - तेलंगणातील गँगने फसवले, 17 तोळे सोने लंपास, 50 लाखांची खंडणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

तुळजापूर येथील हत्याकांड प्रकरणात महंत शिंदे महाराज यांना दिलासा – छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात अटकपुर्व जामीन मंजुर

November 27, 2026

हत्येचा कट ? सत्ता परिवर्तन, आमदार कैलास पाटीलांच्या जीवाला होता धोका, संजय शिरसाठांचा गोप्यस्फ़ोट

November 23, 2026

अहवाल सादर, कारवाईकडे लक्ष – नगर परिषद घोटाळा, यलगट्टेसह अन्य लोकांवर कारवाईची टांगती तलवार

November 16, 2026
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp