धाराशिव – समय सारथी
सोशल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एका तरुणीशी ओळख करून तिला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्या प्रकरणी धाराशिव येथील अविनाश गडदे याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असुन पोलिसांनी अटक केली आहे. स्वतःचा घटस्फोट झाला असुन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले, तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, त्यातून ती तरुणी गरोदर झाली त्यानंतर तिला गर्भपात करायला लावला. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली.
पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, सोलापूर येथील पिडीत तरुणीला 2014 साली शासकीय नौकरी लागली होती, 2021 मध्ये तिची व गडदे याची टिंडर ॲपवर ओळख झाली त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले त्यावेळी त्याने तो विवाहित आहे पण घटस्फोट झाल्याचे सांगितले. तुझ्याशी लग्न करतो असे खोटे आश्वासन देवून आमिष दाखवले. त्यानंतर शारीरिक संबंध ठेवल्याने ती प्रेग्नेंट झाली. तिला बळजबरी व धमकी देऊन गर्भपात करायला लावला.
2022 मध्ये मुलीची आई आजारी असल्याने तिच्या घरचे तिचे दुसरीकडे लग्न जमवीत असताना मी तिच्याशी लग्न करणार आहे माझ्या शिवाय दुसऱ्या कोणाला लग्न करू देणार नाही. तू मला नाही भेटली तर मी आत्महत्या करीन असे म्हणत उंदीर मारायचे औषध व झोपेच्या गोळ्या खात असल्याचे व्हिडिओ बनवून तिला व तिच्या कुटुंबाला धमकी दिली. 2021 पासुन हा प्रकार सुरु होता. मार्च 24 ला तिच्या आईचे निधन झाले आणि तिची बदली मुंबई येथे झाली. ती काही दिवस पुणे व काही दिवस मुबंई असे काम करीत होती.
धमकावून ऑफीसमध्ये तुझी बदनामी करेल, नौकरी घालवीन अशी भिती दाखवून तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवत वारंवार तिला ब्लॅकमेल केले. 8 मे 2026 रोजी अविनाश पाश्र्वनाथ गडदे हा तिच्या ऑफीसमध्ये आला व तिथे गोंधळ घातला, शिवीगाळ करून मारहाण केली. तीने दिलेल्या तक्रारी वरून गडदे याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 351(2),352,356(1) व 69 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.











