धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. एका मुलीशी मैत्री करून तिला तिळगुळातुन गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केले, त्याचे फोटो व व्हिडिओ काढुन ते व्हायरल करण्याची धमकी देऊन अनेकवेळा ब्लॅकमेल करण्यात आले. दग्यात जावु तु मुस्लीम धर्म स्वीकार आपण लग्न करू असे म्हणत तिला मारहाण करून खोलीत बंद करून धर्मातरासाठी दबाव टाकण्यात आला.
वारंवार होणाऱ्या लैंगिक अत्याचार व छळाला कंटाळून मुलीने दिलेल्या तक्रारीवरून अरबाज शेख या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. वाशी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असुन पुढील प्रक्रिया व तपास सुरु केला आहे. तुळजापूर येथील घटना ताजी असतानाच हा ‘लव्ह जिहाद’ चा दुसरा प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
वाशी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीबाबत ही धक्कादायक घटना घडली आहे, तीच्या घराशेजारी बांधकाम सुरु होते तिथे पारगाव येथील अरबाज शेख हा कामगार म्हणुन कामावर होता. तो मुलीच्या घरी वारंवार पाणी पिण्यासाठी व अन्य काहीही बहाणा करून येत असे. त्याने मुलीचा शेतात व इतर ठिकाणी पाठलाग करून मैत्री स्थापित केली त्यानंतर तिला एक मोबाईल बोलण्यासाठी म्हणुन भेट दिला.
जानेवारी महिन्यात तिळगुळ देण्याच्या बहाण्याने भेट घेत, तिळगुळ दिले त्यानंतर पिडीत मुलीला पकडून शेतात बाजुला नेत तीच्यावर लैंगिक अत्याचार केला व त्याचे फोटो व व्हिडिओ काढले. झालेली घटना सांगितल्यास व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करील व जीवे मारण्याची धमकी दिली. याच आधारे त्याने तिला अनेक वेळा बोलावून अत्याचार केले.
एप्रिल महिन्यात आरोपीने मुलीला धमकी देऊन रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी ये गावी नेले, तिथे तिला आपण दग्यात जावु, तु मुस्लीम धर्म स्वीकार, आपण लग्न करू असे म्हणत दबाव टाकला. तू धर्म बदलायची जबरदस्ती का करीत आहे असे म्हनत नकार दिल्यावर त्याने मुलीला मारहाण करून 8 दिवस डांबून ठेवले, अरबाज झोपल्यावर मुलीने तेथून पळ काढुन मामाचे घर गाठले व पोलिसात तक्रार दिली.











