धाराशिव – समय सारथी
धाराशिव पोलिसांनी लॉजवर सुरु असलेल्या देहव्यापारचा भांडाफोड केला असुन 3 महिलांची सुटका केली आहे त्यातील 2 महिला ह्या बांगलादेशी असल्याने मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. तामलवाडी येथील मिलन लॉजवर हा वेश्या व्यवसाय सुरु होता, पोलिसांनी 2 जणांना अटक केली असुन तपास सुरु आहे.
तामलवाडी येथील मिलन लॉजमध्ये काही महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी छापा टाकून 3 पिडीत महिलांची सुटका केली. दिलीप सिद्धाप्पा मंगरुळे (वय 43, रा. अविनाश नगर, एमआयडीसी सोलापूर) व संतोष नामदेव पवार (वय 40, रा. तिऱ्हे, ता. उत्तर सोलापूर) या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी मोबाईल, पिग्मी पासबुक, नोंदीचे रजिस्टर, यूपीआय स्कॅनर मशीन, लॉजचा परवाना फॉर्म रोख रक्कम जप्त केली आहे. तामलवाडी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध बीएनएस कलम 143, 144, 3(5) तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3, 4, 5 अन्वये गुरनं 60/2026 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











