शिवसेना नेते आमदार डॉ तानाजीराव सावंत यांच्या गाडीचा अपघात – सावंत सुखरूप
उस्मानाबाद – समय सारथी
शिवसेनेचे नेते , राज्याचे माजी जलसंधारण मंत्री आमदार डॉ तानाजीराव सावंत यांच्या गाडीचा अपघात झाला असून ते सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती आहे.
सावंत हे गेली दोन दिवस उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर होते त्यात त्यांनी भूम परांडा व वाशी येथे जनता दरबार घेतला तर उस्मानाबाद येथे शिवसंपर्क अभियान घेतले. त्यानंतर परंड्याहुन पुण्याकडे परतत असताना रात्री पुणे – सोलापूर महामार्गवरील वरवंड येथे हा अपघात झाला. सुदैवाने तानाजी सावंत साहिसलामत असून गाडीचे नुकसान झाले आहे.











