धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात सध्या दरोडे, चोरी, लूटमार याचे सत्र सुरु झाले असुन नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धाराशिव शहरातुन जाधववाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अंबेहोळ येथील एका दामपत्यावर चाकू हल्ला करुन लुटण्यात आले.
चांद साबू सय्यद व त्यांची पत्नी अशिबा चांद सय्यद हे धाराशिव येथून अंबेहोळ येथे दुचाकीवर गावी जात असताना त्यांना 3-4 तरुणांनी 2 दुचाकीवर येत गाडी आडवी करुन यांच्यावर हल्ला करुन लूटमार केली. सय्यद यांच्याकडील 10 हजार व सोन्याचे दागिने लुटून हे चोर फरार झाले. सय्यद यांच्या पत्नीच्या हाताला चाकू लागला असुन त्या दोघांवर धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.