Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

ड्रग्ज माफियाला ‘राजाश्रय’ – खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र, 2 नगराध्यक्ष भाजपात,  आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा आधार 

समय सारथी by समय सारथी
November 12, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
769
VIEWS

धाराशिव – समय सारथी

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या 2 माजी नगराध्यक्ष यांनी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केल्यानंतर भाजप ड्रग्ज माफियाला राजाश्रय देतोय का अशी टीका होत असुन खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. त्या पत्रात त्यांनी अश्या बाबतीत नाराजी व्यक्त केली आहे.

तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर कदम उर्फ मेंबर व माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या ‘कुशल’ नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रवेश केला. हे दोघे भाजपकडुन नगर परिषद लढणार असल्याची माहिती आहे. आमदार राणा यांनी ड्रग्ज गुन्ह्यातील काही आरोपीना एकाच छताखाली आणत भाजप प्रवेश दिला असुन मानाचे स्थान दिले आहे.

छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने कणे व कदम यांच्यासह 9 जणांना निकाल लागेपर्यंत ‘धाराशिव तहसील’ प्रवेश बंदी केली आहे. घटना, पुरावे, साक्षीदार हे सगळे तुळजापूर येथील आहेत त्यामुळे पोलिस कोर्टात जाऊन ‘तुळजापूर’ बंदी करण्यासाठी ठोस भुमिका घेणार का ? हे पाहावे लागेल.

तुळजापूर शहरातील काही जणांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्यात आला. यामध्ये शहरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींंचा देखील समावेश होता, अशी बातमी वाचनात आली. विशेष म्हणजे हे प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात आणि राणाजगजीतसिंह पाटील या जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत झाले याचे सखेद आश्चर्य वाटले. यासोबतच ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून तितकीच चिंता देखील वाटली असे सुळे यांनी पत्रात म्हण्टले आहे.

– प्रवेश व्हिडिओ –

लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक राजकीय पक्षाला आपली संघटना वाढविण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु त्याचवेळी कोणत्याही अनिष्ट, समाजविघातक प्रवृत्तीला थारा न देण्याची नैतिक जबाबदारी देखील सार्वजनिक आयुष्यात कार्यरत असणाऱ्या प्रत्येकावर असते, याबाबत आपणही सहमत असाल. 

आपण राज्याचे प्रमुख आहात, आपल्यासमोर अनेक कामे पडलेली असतात. त्यामुळे कदाचित ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचली नसावी, किंवा सदर व्यक्तीच्या ड्रग्स गुन्हेगारीमधील पार्श्वभूमीबाबत आपल्याला माहिती देण्यात आली नसावी. हे गृहित धरुन मी आपणास हे पत्र लिहित आहे.  समाजहित डोळ्यासमोर ठेवून ड्रग्जविरोधी लढ्यात आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत. या संदर्भात मी यापूर्वीही आपणांस पत्राद्वारे कळविले होते.

तुळजापूरमधील या प्रकाराकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई कराल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. ड्रग्स तस्करीला या महाराष्ट्रात राजाश्रय दिला जाणार नाही अशा प्रकारचा सकारात्मक संदेश  समाजात जाण्यासाठी आणि ड्रग्जविरोधी मोहिमेला बळकटी मिळावी यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. याची आपण योग्य ती दखल अवश्य घ्याल की अपेक्षा त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. 

सोहळा – ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील 2 माजी नगराध्यक्ष भाजपात, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे यश ? टीकेसह समिश्र प्रतिक्रिया

दैनिक समय सारथी

सोहळा – ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील 2 माजी नगराध्यक्ष भाजपात, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे यश ? टीकेसह समिश्र प्रतिक्रिया

व्हिडिओ –

https://www.facebook.com/share/v/1H8qQ6xQUX/
Previous Post

10 तोळे सोने, 2 लाख घेताना अटक – ठाणे प्रभारीसह 4 पोलिसांवर गुन्हा नोंद – पुणे व सोलापूर लाचलुचपत पथकाची धाराशिवमध्ये कारवाई

Next Post

अपील – आत्महत्या गुन्ह्यात धाराशिव पोलिसांची ठोस भुमिका, सुरेश कांबळे यांचे नाव वगळले

Related Posts

महाराष्ट्र

भव्य दिव्य मिरवणुक – डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, बहुजन योद्धा संघटना – मनोज जरांगे पाटील धाराशिवला येणार

April 16, 2026
महाराष्ट्र

हल्ला, तहसीलदार निलेश काकडे यांची गाडी अडवली – वाळूचा प्रश्न, गुन्हा नोंद – आंदोलनाचा इशारा

April 16, 2026
महाराष्ट्र

डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज – 3 गुन्हे दाखल, अनेक डॉल्बी जप्त – धाराशिव पोलिसांची कारवाई

April 16, 2026
महाराष्ट्र

Impact – ‘कला केंद्र मुक्त’ धाराशिव, पालकमंत्री यांची ठोस भुमिका, जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई – 6 केंद्राचे परवाने रद्द, सील

April 14, 2026
महाराष्ट्र

अखेर सील – महाकाली कला केंद्राला टाळे, महसुल व पोलिस विभागाची संयुक्त कारवाई – जिल्हाधिकारी यांचे आदेश

April 14, 2026
महाराष्ट्र

हक्कभंगाचा इशारा – ड्रग्ज व गुटखा तस्करी, आमदार सुरेश धस आक्रमक, फरार आरोपी पकडा, मकोका लावा

April 14, 2026
Next Post

अपील - आत्महत्या गुन्ह्यात धाराशिव पोलिसांची ठोस भुमिका, सुरेश कांबळे यांचे नाव वगळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

भव्य दिव्य मिरवणुक – डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, बहुजन योद्धा संघटना – मनोज जरांगे पाटील धाराशिवला येणार

April 16, 2026

हल्ला, तहसीलदार निलेश काकडे यांची गाडी अडवली – वाळूचा प्रश्न, गुन्हा नोंद – आंदोलनाचा इशारा

April 16, 2026

डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज – 3 गुन्हे दाखल, अनेक डॉल्बी जप्त – धाराशिव पोलिसांची कारवाई

April 16, 2026
April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp