दुधसंघ, सुतमिल, बँक व उपसा सिंचन संस्थाचे बळकटीकरण – स्थानिक उद्योजक व रोजगार निर्मिती
परंडा – समय सारथी
पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत हे आरोग्यमंत्री झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यासह भुम, परंडा, वाशी या भागात हजारो कोटी रुपयांचा विकास निधी आला असुन यातून अनेक लोकोपयोगी विकास कामे झाली आहेत. 2019 ला विक्रमी मतांनी निवडुन आल्यानंतर 2024 पर्यंतच्या 5 वर्षाच्या काळात पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी विकासासाठी लागणाऱ्या मुलभूत सुविधा उपलब्ध करण्याचे महत्वाचे काम केले. मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्यावर आता शाश्वत विकासाची संकल्पना मंत्री सावंत यांनी मांडली आहे . 2029 पर्यंत मी काय करणार हे महत्वाचे आहे असे पालकमंत्री डॉ सावंत यांनी सांगत विकासाचा रोडमॅप जनतेसमोर मांडत आहेत.
कृष्णा मराठावाडा उपसा सिंचन योजनेचे पाणी परंडा येथे आल्यावर सगळे प्रश्न संपले असे नाही, पाणी सगळीकडे साठवण तलाव व वितरण व्यवस्था झाली पाहिजेत. शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही, हक्काची डीसीसी बँक मोडून खाल्ली, दुध संघ संपवला, सुतमिल शेअर गोळा केले मात्र ती सुरु झाली नाही त्या सर्व संस्था पुन्हा नावारुपास आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्याची शेत धरण, तलावापासुन दुर आहेत त्यांना उपसा जलसिंचन संस्था नोंदणी करायला सुरु करा असे मंत्री सावंत म्हणाले. त्या पाणीपुरवठाचे सर्व 5 वर्षाचे प्रतीवर्षे 11 कोटी प्रमाणे 55 कोटींचे बील भैरवनाथ शुगर भरेल असे आश्वासन दिले, या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एका वर्षाच्या आत 5 लाख मीटरचा दुध संघ भुम येथे करण्याचे वचन त्यांनी दिले आहे. भुम परंडा वाशी येथे दीड दीड हजार एकरची एमआयडीसी मंजुर केली आहे, त्याबाबत मिटिंग झाली असुन पुणे मुंबई येथील उद्योजक यांना इथे उद्योग सुरु करुन रोजगार देऊ व स्थानिक तरुणांना उद्योजक बनवू, 4-5 हजार कोटींची गुंतवणूक आणल्याशिवाय शांत बसणार नाही. धवल, हरित, उद्योग क्रांती करायची आहे असे सांगत त्यांनी हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी उपाययोजना व नियोजन देखील केले आहे. येत्या 5 वर्षात धाराशिव जिल्ह्याला लागलेला दुष्काळी, आकांक्षितपणाचा डाग पुसण्याची शपथ सावंत यांनी घेतली, हा डाग पुसल्याशिवाय तानाजीराव सावंत शांत बसणार नाहीत.
महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून जितका निधी आला त्यापेक्षा जास्त निधी आणला आहे. परंडासाठी 175 कोटी निधी आला, हे शहरात तर 13 गट व 26 गणात ग्रामीण भागात प्रत्येक गटात 40 कोटी निधी दिला, दीड हजार कोटींचा निधी आणला आहे त्यामुळे ग्रामीण भागात अनेक विकास कामे झाले असुन नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सावंत यांनी केलेल्या विकास कामामुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. भावनिक मुद्दे, राजकीय आरोप प्रत्यारोप पेक्षा विकासाच्या मुद्याना घेऊन मंत्री डॉ सावंत हे निवडणुकीला समोरे जात आहेत.