धाराशिव – समय सारथी
एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे व संसार थाटन्याचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी एका महिला आरोपीला धाराशिव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस जी ठुबे यांनी शिक्षा सुनावली. आरोपी नाजमीन दस्तगीर शेख हिला 1 वर्ष कारावास व 5 हजार दंड ठोठावला. विशेष अतिरिक्त शासकीय अभियोक्ता ऍड सचिन सुर्यवंशी यांनी सादर केलेले पुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरून ही शिक्षा सुनावन्यात आली. धाराशिव शहरातील ही घटना असुन सहायक पोलीस निरिक्षक दिनेश जाधव यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले.
पिडीत मुलीच्या आईने धाराशिव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार तिची अल्पवयीन मुलीस त घराशेजारी राहणारी नाजमीन दस्तगीर शेख हिने भेळ खावून येतो असे म्हणून घरातून घेवून गेली, ती परत न आल्याने पोलिसात तक्रार केली. भारतीय न्याय संहिता कलम 137 (2) अन्वये गुन्हा नोंद करून पोलिसांनी तपास करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. कोर्टात 3 साक्षीदार तपासण्यात आले,त्यात अल्पवयीन पिडीतेची व फिर्यादीच साक्ष महत्वपूर्ण ठरली.
पिडीताचे कुटुंब हे भाजीपाला विक्री करुन आपली उपजिवीका भागवत असे. दरम्यानच्या काळात २० वर्ष वयाच्या महिला आरोपी नाजमीन शेख हिने पिडीतेच्या कुटुंबाशी सलगी निर्माण केली. तीने पिडीतेच्या कुटुंबात मी शहरात एकटी राहत असून मला आई-वडिल नाहीत माझा सांभाळ करणारे कोणीही नाही अशा आशयाची विनंती करुन पिडीतेच्या घरी तिला राहण्यासाठी आश्रय मिळवला. 1 महिना ती तिथे राहिली.
दरम्यानच्या काळात अल्पवयीन पिडीत मुलीस तिचे एका मुलीवर प्रेम आहे. तो सुध्दा मला खुप आवडतो असे म्हणून एक दिवस गालाचे चुंबन घेतले. महिला आरोपीने अल्पवयीन पिडीतेस आपण दोघी मिळून पळून जावून लग्न करु आणि संसार करु असे आमिष दाखवून आल्पवयीन पिडीतेस फूस लावून पळून घेवून गेले.
पिडीतेस वारंवार संमोहित करुन तिला म्हणेल त्याप्रमाणे वागण्यास भाग पाडत असे. पिडीतेस पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून घरी आणले असता ती तिच्या आई-वडिलांना ओळखत नव्हती त्यामुळे तिला सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
सदर प्रकरणातील फिर्यादीने न्यायालयात सांगितले की, नाजमीन हिने ब-याचशा मुलींना फसवले असून त्यांचे लैंगीक शोषन केले आहे. तिच्या 2 मामासोबत मिळून गरीबांचे घरे शोधते, त्या ठीकाणी राहते व मुलींना घेवून त्यांना फसवून कट करुन अपहरण करते व पुढे त्या मुली विकल्या जातात. एकंदरीत पिडीता व पिडीतेची आई यांची साक्ष पाहिली असता सदर प्रकरण गंभिर स्वरुपाचे असल्याचे निष्पन्न झाले.
सदर प्रकरणाची सुनावणी ए एस आवटे, तत्कालीन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश धाराशिव व प्रकरणाची अंतिम सुनावणी एस जी ठुबे, अति जिल्हा व सत्र न्यायाधीश धाराशिव यांचे समोर झाली. न्यायालयासमोर आलेला साक्षीपुरावा व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन एस. सुर्यवंशी, यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन कोर्टाने शिक्षा सुनावली.












