धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील एका पोलिस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा नोंद झाल्याने खळबळ उडाली आहे. वाशी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र लिंबाजी शिंदे यांच्यावर भूम पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एका महिलेच्या फिर्यादीवरून पोलीस निरीक्षक शिंदे यांच्यावर पोलीस ठाण्यात कलम 354,354 अ,504,506 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शिंदे यांच्यासह सुनिता गोविंद मस्के (बीड) व प्रवीण नावाचा चालक या तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे .ही घटना भूम शहरातील पार्डी रोड लगत असणाऱ्या शासकीय विश्रामगृह समोरील तुळजाई निवास येथे घडली.
याबाबत सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की , वाशी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे हे भूम येथील शासकीय विश्रामगृहासमोरील तुळजाई निवास येथे सुनिता गोविंद मस्के (बीड) या महिलेसोबत राहत होते, ते येथे अधून मधून येत असत. फिर्यादी ही आरोपी सुनीता गोविंद मस्के हिची मैत्रीण आहे. 5 जून रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास रवींद्र शिंदे यांनी फिर्यादीस पिण्यासाठी पाणी मागितले, त्या घरामध्ये पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर शिंदे हे तिच्या पाठीमागे घरामध्ये गेले व डावा हात पकडून आय लव यू असे म्हणत किस घेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर 6 जुन रोजी आरोपी सुनीता मस्के हिने फिर्यादीस आरोपी रवींद्र शिंदे यांच्यासोबत एकाच बेडरूम मध्ये झोपा असे म्हणाली. हा प्रकार कोणाला सांगितल्यास या दोघांनी फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पुढील तपास भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी हे करत आहेत .