धाराशिव – समय सारथी
लाच घेतल्याच्या आरोपातुन बेंबळी पोलीस स्टेशनचे तत्कालीन पीएसआय योगेश पवार यांची धाराशिव येथील न्यायालयाने पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे अशी माहिती ऍड दिलीप मराठे यांनी दिली. बेंबळी पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस सब इन्स्पेक्टर (सध्या बीड) यांचेवर लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालय धाराशिव यांनी कलम 7 अन्वये 2019 मध्ये गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्यातुन धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात आरोपीचे वतीने ऍडवोकेट दिलीप मराठे यांनी काम पाहत सक्षमपणे बाजु मांडली. तक्रारदाराच्या कारच्या अपघाताच्या पंचनाम्याची प्रत देण्यासाठी 2 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून स्विकारल्याचे आरोप योगेश पवार यांचेवर लावले होते.