धाराशिव – समय सारथी
धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहीत लोकसभा निवडणुकीबाबत मार्गदर्शन मागविले आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. जास्त उमेदवारी अर्ज आल्यास ईव्हीएम
ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागतील त्यामुळे या स्तिथीची पुर्वकल्पना देत काय उपाययोजना कराव्यात याबाबत जिल्हाधिकारी यांनी पत्र लिहले आहे.
मराठा समाजाने उमेदवार उभे केल्यास मतपत्रिका व मतपेट्याचा वापर करावा लागेल, अधिकारी, वाहन, अपुरे मनुष्यबळ आदी अडचणी येणार आहेत. उमेदवार वाढल्यास मतपत्रिका तितक्याच मोठ्या आकाराची होणार, घडी घातल्यास मतपेटीमध्ये जास्त जागा व्यापली जाणार आहे असे जिल्हाधिकारी यांनी पत्रात लिहले आहे.
जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविले असुन मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांना पत्र लिहले आहे. मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी लागेल ही बाब निदर्शनास आणून देत मार्गदर्शन मागविले आहे त्यावर निवडणुक आयोग काय मार्गदर्शन करते याकडे लक्ष लागले आहे.
धाराशिव जिल्ह्यात 736 गावे असुन बार्शी व औसा या तालुक्यातील जवळपास 150 पेक्षा जास्त गावे आहेत. 384 पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर / मतपत्रिकावर निवडणुक घ्यावी लागते. एका मतदार संघात जास्तीत जास्त 24 मशीन उपलब्ध होऊ शकतात त्यात एका मशीनमध्ये 16 उमेदवार असे 384 उमेदवार ईव्हीएमवर निवडणुक घेता येतात त्यानंतर अधिक उमेदवार झाल्यास मतपत्रिकेवर निवडणुक घ्यावी लागते.
मराठा समाजाने सुरु केली लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली असुन मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर ग्रामपंचायतमध्ये ठराव व बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील सावरगाव ग्रामपंचायतमध्ये ठराव घेण्यात आला तिथे लोकवर्गणी करुन 3 उमेदवार सर्वानुमते उभे केले जाणार आहेत. तुळजापूर तालुक्यातील मोर्डा येथे आज उमेदवारी बाबत बैठक होणार आहे तर भुम येथेही बैठकाचे सत्र सुरु आहे. प्रत्येक गावात एक उमेदवार उभा केला जाणार आहे.
धाराशिवमधुन 1 हजार उमेदवार उभे राहण्याची शक्यता आहे. 384 इतक्या पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुक घ्यावी लागले. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज आक्रमक आहे.