धाराशिव – समय सारथी
मराठा आरक्षण अंमलबजावणीकरावी यासाठी मनोज जारांगे यांचे उपोषण सुरु आहे, त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या घरासमोर मराठा आंदोलकांचे ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. मराठा आंदोलक आक्रमक होत सत्ताधारी आमदार पाटील यांच्या घरासमोर बसले आहेत.
तीव्र आंदोलनाचा इशारा मराठा समाजाने दिला असुन जरांगे पाटील याचे उपोषन सोडवण्याची व आरक्षण अंमलबजावणीची आंदोलकांची मागणी आहे.जरांगे यांना काही झाले तर सर्वस्वी जबाबदार सरकार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या घराचे गेट लावून घेत आंदोलन सुरु केले आहे. जोरदार घोषणाबाजी सुरू असुन मोठ्या संख्येने आंदोलक एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे. जरांगे यांच्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आंदोलन सुरु केले असुन पोलिस दाखल झाले आहेत.