Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

टीकास्त्र – दानवेंचा आमदार पाटीलांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री मसीहा समजता का ? संस्थान जहागिरी आहे काय ? गाभारा प्रकरण

समय सारथी by समय सारथी
October 15, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव – समय सारथी

तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात सोलापूर येथील मटका किंगने प्रवेश केल्याच्या प्रकरणावरून शिवसेना उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आमदार तथा मंदीर विश्वस्त राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर टीका करीत हल्लाबोल केला. मंदीर संस्थान काय त्यांची जहागीरी आहे काय? ते काय मुख्यमंत्री आहेत काय? असे म्हणत त्यांनी यातील दोषीवर कारवाईची मागणी केली.

तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात भोपे पुजारी सोडता इतरांनी प्रवेश करू नये असा दंडक असुन तो सर्वांनी पाळला पाहिजे. तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात सोलापूर येथील तडीपार गुंड असलेला मटका किंग अरुण उर्फ दादा रोडगे याने थेट प्रवेश करून दर्शन घेत फोटोसेशन केले यावेळी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे स्वीय सहायक सुधीर जमदाडे हा सोबत होता. राणाजगजीतसिंह हे धाराशिवचे मसीहा झाले आहेत असा उपरोधीक टोला दानवे यांनी लागवला.

व्हीआयपी पासचा घोटाळा हा त्यांचा पीए करीत आहे अशी माहिती आहे. तुळजाभवानीचे संस्थान काय त्यांच्या नावावर केले आहे काय ? त्यांची ही जहागिरी आहे काय ? जिल्हाधिकारी यांना कारवाई करायला लावणारा तो काय राज्याचा मुख्यमंत्री आहे काय ? तो एक आमदार आहे, त्याने त्याचे काम करावे असे दानवे म्हणाले.
तुळजाभवानी देविजींचे फोटो मंदिर संस्थानकडून अधिकृत रित्या काढले जातात तथापि, श्री तुळजाभवानी देविजींचे फोटो तसेच व्हिडीओ कोणत्याही विधी दरम्यान किंवा इतर वेळी अन्य कोणीही वैयक्तिक रित्या काढु नयेत अन्यथा संबंधितांवर देवुळ कवायत कलम 24 व 25 अन्वये संबंधितावर कारवाई करण्यात येईल अशी नोटीस मंदीर व्यवस्थापक तहसीलदार माया माने यांनी काढली होती, त्यामुळे आता कोणावर व कधी कारवाई होते असा सवाल विचारला जात आहे.

दररोज हजारो भाविक, वारकरी, वृद्ध आणि सामान्य जनता तासनतास रांगेत उभी राहून अत्यंत श्रद्धेने नियमांचे पालन करत दर्शन घेतात. मात्र, दुसरीकडे काही प्रतिष्ठित व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींकडून मंदिराचे सर्व कायदे, संकेत आणि प्रोटोकॉल पायदळी तुडवले जात असल्याचा गंभीर प्रकार असुन कारवाई करण्याची मागणी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर राजे कदम यांनी केली आहे.

तुळजाभवानी मंदिरात गाभाऱ्यात जो प्रकार घडला आहे त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांना सूचना दिल्या आहेत. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया आमदार पाटील यांनी सोशल मीडियावरून दिली.

हातच्या काकणाला आरसा कशाला ? याप्रमाणे उघड उघड ते सर्व गाभाऱ्यात दिसत असताना आता आमदार कोणती चौकशी करणार हा प्रश्न आहे. गेली काही काळापासून त्यांनी मनमानी कारभार व मंदीराला खासगी मालमत्ता समजली आहे, जे की चुकीचे आहे. तुम्ही मुंबईतील ताज मध्ये आहेत की दिल्लीत याचे भाविकांना देणे घेणे नाही, कारवाईचा बोला ? पीएवर काय कारवाई करणार, कोणाच्या आदेशाने तो सोबत गाभाऱ्यात गेला, परिसरातील सीसीटीव्ही तपासा. पाठराखण व केवळ वेळ काढुपणा करण्यासाठी ‘हाताची घडी तोंडावर बोटं’ अश्या स्वरूपाची ही नाटकी दुटप्पी भुमिका असल्याचा आरोप पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी केला आहे

Previous Post

दिवाळी भेट – दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पालकमंत्री सरनाईकांचा पुढाकार, फराळासह कीट देणार 

Related Posts

महाराष्ट्र

दिवाळी भेट – दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पालकमंत्री सरनाईकांचा पुढाकार, फराळासह कीट देणार 

October 15, 2026
महाराष्ट्र

कला केंद्र, गुन्हेगारी, अर्थ व राजकारण – हालचाली, कला केंद्र मुक्तीसाठी प्रशासन अग्रेसर, नियमांचा आधार – जनक्षोभ

October 15, 2026
महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती – पक्षाचा चेहरा, तरुणांत उत्साह व अभिनंदन

October 14, 2026
महाराष्ट्र

मुस्लिम समाजाचा ऐतिहासिक निर्णय – आता डीजे, डॉल्बी व बँजोला कायमचा नकार – बैठकीत एकमुखी ठराव, निर्धार

October 15, 2026
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची ? शेतकऱ्यांची चेष्टा करू नका ; हेक्टरी ५० हजारांची मदत द्या ! आमदार कैलास पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

October 14, 2026
महाराष्ट्र

भुसंपादन घोटाळा – तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना तब्ब्ल 5 महिन्यांनी जामीन मंजुर, दिलासा

October 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

टीकास्त्र – दानवेंचा आमदार पाटीलांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री मसीहा समजता का ? संस्थान जहागिरी आहे काय ? गाभारा प्रकरण

October 15, 2026

दिवाळी भेट – दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पालकमंत्री सरनाईकांचा पुढाकार, फराळासह कीट देणार 

October 15, 2026

कला केंद्र, गुन्हेगारी, अर्थ व राजकारण – हालचाली, कला केंद्र मुक्तीसाठी प्रशासन अग्रेसर, नियमांचा आधार – जनक्षोभ

October 15, 2026
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp