धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात फरार आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर कदम यांना अटक केल्यानंतर त्यांना धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांच्या कोर्टात हजर करण्यात आले. पोलिसांच्या दोषारोप पत्रानुसार कदम हे तस्कर गटातील आरोपी आहेत, पोलिसांनी त्यांना 10 दिवसांची कोठडी मागितली त्यानंतर कोर्टाने तपास अधिकारी सपोनि गोकुळ ठाकुर व जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांचा युक्तिवाद ऐकून 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कोल्ड ब्लडेड गुन्हा असल्याचा युक्तिवाद ऍड देशमुख यांनी केला.
तुळजापूर ड्रग्ज तस्करी 38 आरोपी असुन त्यातील 22 जण अटकेत असुन 15 जन फरार आहेत तर अलोक शिंदे यांना अटकपुर्व जामीन मिळाला आहे. धाराशिव जिल्हा कोर्टात व छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात प्रत्येकी 6 आरोपींचा जामीन अर्ज सुनावणी स्तरावर प्रलंबित आहे. पोलिस अधीक्षक रितु खोकर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत.
फरार आरोपी (15) – माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर, मुंबई येथील वैभव गोळे, प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, उदय शेटे,अभिजीत गव्हाड, तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव,दुर्गेश पवार व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 15 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.