Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

कोर्टाचे निरीक्षण – ड्रग्ज तस्करीत विनोद गंगणे यांचा मुख्य आरोपी सारखा सक्रीय सहभाग, ते सिंडीकेटचा भाग, कलम वाढ 

समय सारथी by समय सारथी
June 22, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
2.9k
VIEWS

वाचा आदेशातील महत्वाचे मुद्दे

धाराशिव – समय सारथी

तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील आरोपी विनोद उर्फ पिटू गंगणे यांचा जामीन धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांनी नाकारला आहे. जामीन नाकारताना कोर्टाने अनेक महत्वाचे निरीक्षण व कायदेशीर बाबी त्यांच्या आदेशात नमुद केल्या आहेत. गंगणे यांचा सहभाग हा केवळ ड्रग्ज सेवनापुरता (व्यसन) मर्यादित नसुन ते ड्रग्ज तस्कर, पेडलर यांच्याशी अनेक वर्ष थेट संपर्कात होते. इतर मुख्य आरोपी प्रमाणे गंगणे यांचा ड्रग्ज तस्करीत सक्रीय सहभाग होता. ड्रग्ज सिंडीकेटचा ते एक भाग आहेत, त्यामुळे कलम 27 बरोबरच NDPS चे कलम 29, 8(c), 21(b) ही कलमे गंगणे यांना सुद्धा इतर आरोपी प्रमाणे समान लागु होतात असे कोर्टाने आदेशात नमुद केले आहे. गंगणे हे सध्या धाराशिव येथील जेलमध्ये 25 जुनपर्यंत 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असुन अधिक तपासासाठी पोलिस कोठडीचा हक्क कोर्टाने अबाधीत ठेवला आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांचा युक्तिवाद यात महत्वाचा ठरला.

ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात पोलिसांनी 10 हजार 744 पानाचे दोषारोपपत्र दाखल केले त्यात 36 पैकी 26 आरोपी तस्कर तर विनोद गंगणेसह 10 आरोपी कलम 27 अंतर्गत सेवन गटात असल्याचे दाखवले मात्र गंगणे यांच्या अटकेनंतर पोलिस तपासात काही पुरावे समोर आल्याने,दोषारोप पत्रातील उपलब्ध कागदपत्रे, परिस्थितीजन्य बाबी पोलिस व सरकारी वकिलांनी कोर्टात सक्षमपणे मांडल्याने गंगणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दोषारोपपत्रात तस्कर व सेवन असे केलेले 2 गट पोलिसांसाठी कोर्टात भुमिका मांडताना डोकेदुखी ठरत असुन कोर्टाने काही मुद्यावर पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. 

6 जुन रोजी गंगणे यांचा जामीन नाकारल्यानंतर अटक करण्यात आली त्यानंतर त्यांना 2 वेळेस 12 जुन पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या काळात त्यांनी तपासात सहकार्य केले नाही, त्यांनी अधिक काळ रुग्णालयात उपचारासाठी घालवला, गहाळ मोबाईल दिले नाहीत. 13 जुनला न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर ते 16 जुन पर्यंत रुग्णालयात ऍडमिट होते त्यानंतर त्यांना धाराशिव जेलमध्ये दाखल करण्यात आले, त्यावेळी त्यांची तब्येत ठीक असल्याचे व जेलमध्ये जाण्याची स्वतः तयारी दर्शवली मात्र जामीन अर्जावेळी वैद्यकीय कारण दिले जाते असे कोर्टाने म्हण्टले आहे.

गंगणे हे पोलिसांचे ‘खबरी’ होते, त्यांनी ‘टीप’ दिली होती तर मग गुन्हा नोंद झाल्यावर 2 मोबाईल गहाळ झाल्याचा गुन्हा फरार असताना मोहोळ पोलिस ठाण्यात दाखल केला, यातून पुरावे नष्ट करण्याची गुन्हेगारी मानसिकता व कट दिसुन येते. स्वतः अडकू नये म्हणुन गंगणे यांनी 1 लाख 85 हजार रुपयांचे ड्रग्ज दुसऱ्याच्या फोन पे वरून मागवले व त्यांना रोख कॅश दिली. संगीता गोळे, संतोष खोत, पिंटू सुर्वे, अमित अरगडे, गजानन हंगरगेकर, विश्वनाथ उर्फ पिंटू मुळेसह अन्य आरोपीसोबत आर्थिक व्यवहार, साक्षीदार यांचे जबाब व त्यांनी 12 लाखांचे ड्रग्ज वेळोवेळी खरेदी केल्याचे पुरावे कोर्टात दिले, सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी मांडलेले हे मुद्दे व युक्तिवाद महत्वाचे ठरले. 

धाराशिव कोर्टाचे आदेश

20 जुन रोजी तपास अधिकारी सपोनि गोकुळ ठाकुर यांनी कोर्टात त्यांचे म्हणणे सादर करताना काही ठिकाणी गंगणे यांचा सहभाग सेवनापुरता मर्यादित असल्याचे नमुद केले मात्र कोर्टाने इतर अनेक मुद्दे गृहीत धरत संपुर्ण गुन्ह्यातील सहभाग आदेशात अधोरेखित केला. वस्तुस्तिथी, परिस्थितीजन्य बाबी ह्या पोलिसांच्या से अर्थात लेखी म्हणण्यात मांडल्या आहेत त्या काळजीपुर्वक पहिल्या पाहिजेत. तपास अधिकारी यांनी गंगणे यांना अटक केल्यावर, पोलिस कोठडी, जामिनीला विरोध करताना मांडलेले कायदेशीर मुद्दे, पुरावे एकत्रीतपणे विचारात घेतले पाहिजे, त्या मुद्याकडे केवळ से मधील काही शब्दामुळे (सेवन) दुर्लक्ष करता येणार नाही. पोलिसांची भुमिका व संपुर्ण म्हणणे एकत्रीतपणे वाचले पाहिजे, केवळ एखादा शब्दापुरते नव्हे असे कोर्टाने म्हण्टले आहे.

गंगणे यांनी वेळोवेळी तस्कर, पेडलर यांच्याकडून ड्रग्ज घेतले, त्यांचे ड्रग्ज सिंडीकेट सोबत थेट संबंध होता व ते ड्रग्ज सिंडीकेटचा भाग आहेत. त्यांचा संबंध केवळ सेवनापुरता मर्यादित नाही. गुन्ह्यांचे स्वरूप, व्याप्ती, परिस्तिथीजन्य पुरावे पाहता त्यांचा इतर मुख्य आरोपी सारखा सक्रीय सहभाग आहे. कोर्टासमोर गंगणे यांच्या अटक, जामीन सुनावणीत वेळोवेळी समोर आलेल्या बाबी, पुरावे महत्वाचे आहेत त्यामुळे गंगणे यांचा सहभाग केवळ कलम 27 पुरता मर्यादित नसुन गुन्ह्यातील इतर मुख्य आरोपी प्रमाणे इतर कलमे त्यांना सुद्धा समान लागु होतात असे आदेशात नमुद करीत जामीन नाकारला. कलम 29 ( गुन्हेगारी कट, मदत व सहभाग) कलम 8(c) व कलम 21(b) बेकायदेशीर साठवणुक, वाहतूक, खरेदी विक्री यासंबधी कृत्य व त्यास प्रतिबंध ही कलमे लागु होतात असे कोर्टाने म्हणटले आहे. 

कंत्राटी चालक भरती सुवर्णसंधी
Tags: #arrest#court#crime#dharashiv#drugs#durgsracket#investigation#mafiya#Maharashtrapolice#MDDrugs#osmanabad#police#politics#tuljabhavani#tuljapur#ड्रग्ज#तस्कर#तस्करी#तुळजापूर#तुळजाभवानी#धाराशिव
Previous Post

लॉजवर वेश्याव्यवसाय, पर्दाफाश – धाराशिव पोलिसांची कारवाई, 2 महिलांची सुटका, 4 आरोपीना अटक 

Next Post

माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर जाळ्यात – तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात मोठी कारवाई 

Related Posts

महाराष्ट्र

राजाभाऊ पवार यांनी घेतले डॉ पद्मसिंह पाटीलांचे आशीर्वाद – भाजपच्या वाटेवर शिक्कामोर्तब

August 27, 2026
महाराष्ट्र

1 कोटींचा गद्दार – धाराशिव शहरात बॅनर बाजी, पक्षांतर, भाजपने लावले बॅनर

August 27, 2026
महाराष्ट्र

ऑपरेशन टायगर – 4 नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते प्रवेश, धाराशिव नगर परिषदेत सत्ताकारण

August 27, 2026
महाराष्ट्र

ठरलं – ठाकरे गटाचे नगरसेवक शिंदे गटात जाणार, ऑपरेशन ‘टायगर’

August 26, 2026
महाराष्ट्र

श्री तुळजाभवानी मंदिराला MSF चे सुरक्षा कवच – अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या भाविकाभिमुख सेवेसाठी सूचना

August 25, 2026
महाराष्ट्र

निलंबन – महावितरण अधीक्षक अभियंता आडे यांच्यावर कारवाई

August 25, 2026
Next Post

माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर जाळ्यात - तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात मोठी कारवाई 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

राजाभाऊ पवार यांनी घेतले डॉ पद्मसिंह पाटीलांचे आशीर्वाद – भाजपच्या वाटेवर शिक्कामोर्तब

August 27, 2026

1 कोटींचा गद्दार – धाराशिव शहरात बॅनर बाजी, पक्षांतर, भाजपने लावले बॅनर

August 27, 2026

ऑपरेशन टायगर – 4 नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते प्रवेश, धाराशिव नगर परिषदेत सत्ताकारण

August 27, 2026
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp