धाराशिव – समय सारथी
तुळजापुर येथील ड्रग्ज प्रकरणात विजय गंगणे यांनी आमदार राणाजगजीतसिह पाटील यांच्या नियोजन व सल्ल्याप्रमाणे पत्रकार परिषद घेतली त्यात गंगणे यांनी जे बेताल वक्तव्य केले त्याच्या विरोधात तुळजापूर येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात अनेकांनी भावना व्यक्त करीत संताप व्यक्त केला.
पुजारी मंडळाचा अध्यक्ष या नात्याने मी ड्रग्ज प्रकरणात लक्ष घातले असे अमर राजे परमेश्वर कदम म्हणाले. पत्रकार परिषद घेण्यापुर्वी तुम्ही आमची सुद्धा तपासणी करायला हवी की आम्ही शुद्धीवर आहोत का? बेशुद्ध अवस्थेत घेतलेल्या पत्रकार परिषदेला अर्थ नसतो. पुढची पिढी बरबाद होऊ नये म्हणुन हा विषय हाती घेतला. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक म्हणाले की, सगळ्यांना सोबत घ्या, स्वतःचा मुलगा जरी अडकला तरी त्याला सोडू नका असे ते म्हणाले. बुद्धीची कीव येते त्यांच्या बुद्धी प्रमाणे त्यांची उंची दिली आहे. शहरातील सगळे टेंडर तुम्ही घेतले, माझ्या मुलाचे नाव घेतले, तुझ्यात दम असेल तर माझ्या मुलाची व तुझी पण टेस्ट करू. तुमच्यावर काय संस्कार आहेत हे दाखवून दिले. मंदिरात काय केले हे सांगायला भाग पाडू नका, आम्ही नगर परिषदेत लक्ष घातले नाही. आम्हाला पदाची अपेक्षा नाही. मंदीर व पुजारी याची बदनामी होत असेल तर पुजारी मंडळाने भुमिका मांडली पाहिजे. तुमच्या बापाने गाव व मंदीर विकत घेतले आहे का असा सवाल त्यांनी केला. आम्ही नशेत कधी बोलत नाही तर शुद्धीवर बोलत असतो, आमच्या बापाचे आमच्यावर संस्कार आहेत. अजुनही देवीने त्यांना साक्षात्कार करावा व बुद्धी घालावी. विजय गंगणे पत्रकार परिषदेत नशेत होता, तो सर नाही निस्ते नाव लावतो शिक्षण झाले आहे का त्यांचे असा सवाल केला.
मी ट्रेनमधुन सोलापूरला आल्यावर आम्ही आईसक्रीम खायला गेल्यावर पिटू गंगणे तिथे आला त्यात काही चुकीचे केले नाही, पत्रकार परिषदेत विजय गंगणे यांनी शिवाजी महाराज यांच्यावर वक्तव्य केले त्याचा निषेध केला. टेंडरमधुन घोळ घालुन करोडो रुपये कमावले असा आरोप अमोल कुतवळ यांनी आरोप केला. मुळे, गंगणे, कणे हे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांना आरोपी म्हणुन नोंद केले आहे म्हणुन आम्ही नाव घेतले. मंगळवारी चार्जशीट दाखल होत आहे असे विजय गंगणे म्हणाले, त्यांना पोलिसांनी नोटीस दिली आहे. ते उघडपणे सगळे सांगत आहेत त्यामुळे पोलिस यंत्रणा तपासावर साशंकता निर्माण झाली आहे. पत्रकार याला अर्वाच्य भाषेत उघडे करुन मारतो, एखाद्या निर्भीड पत्रकाराला अशी धमकी देणे त्याचा आम्ही निषेध करतो असे कुतवळ म्हणाले.
राहुल खपले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केली, खासदार यांच्यावर ऐकेरी भाषा वापरली 6 आमदार मतदार संघात खासदार निवडून आले आहेत त्यांना बोलु नका, कुठे तुम्ही एका आमदाराची उदबत्ती लावत आहोत. तुम्हीच आरोपी आहेत, षडयंत्र तुमचे आहे, बदनामी करीत आहेत. माझे आजोबा माणिकराव खपले यांचे नाव राज्यात कर्नाटक येथे आहे, मला प्रसिद्धीची गरज नाही.
महेश चोपदार म्हणाले की, प्रवृत्तीला विरोध आहे कोणत्या पक्षाला विरोध नाही, तुळजापूर स्वच्छ करण्यासाठी आम्ही उतरलो आहे. भावी पुढीचा विचार करुन आम्ही उड्डात हेतूने आलो आहोत, एकत्र येऊन सगळे संपवू असे आवाहन त्यांनी केले. कोणाची तरी पाठराखण करू नका, ड्रग्ज संपवण्याचे व्रत्त आम्ही हाती घेतले आहे ते पुर्ण करणार. त्या मुद्यापासुन आम्ही मागे सरकणार नाही. ज्यांना सोबत यायचे आहे त्यांना सोबत घेऊन काम करणार असे ते म्हणाले.
शाम पवार म्हणाले की, आम्ही तुळजापूरकर वासीय म्हणुन एक आलो आहोत. तुम्ही घरे उध्वस्त केली आहेत त्याचा अभ्यास करा. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अनेक विकासकामे केली आहेत. खरंच तळमळ असेल तर आमच्या सोबत या या ड्रग्ज संपवा असे ते म्हणाले.
उत्तम नाना अमृतराव म्हणाले की, विजय गंगणे स्वतःला मोठे समजत आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराज यांना बोलले व एका ज्येष्ठ व जानकार पत्रकार बद्दल वाईट बोलले त्याचा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जाहीर निषेध केला. गंगणे यांची शारीरिक भाषा पाहता असे वाटत होते की, ते ड्रगजच्या नशेत होते असा आमचा समज आहे. त्यांनी काही बाबी कबुल केल्या, तुळजापूर येथे ड्रग्ज प्रथम कोण आणले? त्यांच्या बंधु मार्फत ड्रग्ज आणले. त्यांनी काय तुळजापूरचे पालकत्व स्वीकारले आहे असे ते बोलले मात्र त्यांच्या उंची प्रमाणे लायकी आहे. त्यांच्या ग्रुपने व्यसन व विक्री केली. अनेक माया कमावली त्याची 15 वर्ष पुर्वी काय लायकी होती h3 पाहावे. पैसा, दारू,ड्रग्ज व सत्ता याची मस्ती त्यांच्या अंगात सत्तेची नशा आहे. जे लोक पत्रकार परिषदेत होते त्यांनी गुपचूप ऐकले त्याचा निषेध केला. अंगात आल्यासारखे, खुजेपणा त्यात दिसला आहे, ते स्वतःच पितळ उघडे पाडत आहेत, तुळजापूर येथे किती नालायक लोक राहत आहेत, त्यांच्या हातात सत्ता आहे हे दाखवून दिल्याचा आरोप केला..
नागनाथ भाऊ भांजी म्हणाले की, विजय गंगणे यांना बोलताना भान नव्हते, तुळजाभवानी व छत्रपती शिवाजी महाराज यांचे अतुट नाते आहे. त्यांचे तुळजाभवानी व महाराज यांचे नाव घेण्याची लायकी नाही. महाराज स्वतः सांगतात, विश्वास होता की माझ्या तलवारीत भवानी आहे, इतका विश्वास त्यांना होता. शिवाजी महाराज यांच्या आयुष्यात त्यांनी 3 तलवारी वापरल्या त्यातील एकीचे नाव जगदंबा, भवानी आणि तुळजा असे होते, हे अभिमानाचे आहे. विजय गंगणे ज्या अवस्थेत बोलले ते चुकीचं आहे. त्यांनी अपमान केला आहे, निदनीय आहे.
हृषीकेश मगर म्हणाले की, युवा पिढी वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर पुढाकार घेत आहेत, खासदार पेक्षा 2 मुलांचा बाप आहे असे ते पालक म्हणुन सांगत आहेत. चांगल्या गोष्टीच सत्कार करू. मेरे अंगणे मे म्हणजे सात बारा तुमचा आहे का, लोकसभा मतदार संघात तुळजापूर येते. हे काय युपी बिहार आहे का? लोकप्रतिनिधी म्हणुन आमदार राणाजगजीतसिंह पाटील बांधील आहेत. तुम्ही स्वतः बांधील आहोत, चिले पिले यांना सांगू नका, पुढे करू नका असे बंद करा. 2 वर्षापुर्वी तुमची पिटू गंगणे यावर उपचार केले त्यावेळी का उठाव केला नाही, मतासाठी का पाठीशी घातले. त्यांचे गंभीर परिणाम भोगावे लागले आहे. ड्रग्ज संपवायचं आहे. तुम्ही पुढाकार घ्या आम्ही पाठीशी राहू,. सगळे धंदे, मटका, क्रिकेट सट्टा कोण चालवत आहे. तुमची वैचारिक पात्रता दाखवून दिली. सगळे एकत्र येऊ, लढा देऊ व ड्रग्ज संपवू असे ते म्हणाले