Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

80 जणांना नोटीस, जबाब नोंद सुरु – तुळजापुर ड्रग्ज प्रकरणात पोलिसांच्या नोटीसा, अनेक जन रडारवर 

समय सारथी by समय सारथी
April 4, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
4.4k
VIEWS

धाराशिव – समय सारथी

तुळजापुर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांनी 80 जणांना चौकशीच्या नोटीस पाठवल्या असुन त्यावर त्यांचे म्हणणे, जबाब नोंदवणे सुरु आहे. ही प्रक्रिया अंतीम टप्प्यात असुन यात ज्यांचा सहभाग आढळून आला आहे त्यांना उपलब्ध पुराव्याच्या आधारे आरोपी करण्यात येणार आहे. निष्पन्न झालेल्या आरोपीचे ज्या लोकांशी बँकेत आर्थिक व्यवहार झाले, कॉल रेकॉर्ड उपलब्ध झाले त्यांना चौकशीला सामोरे जावे लागत आहे. नोटीस दिल्यावर संबंधित व्यक्तीला त्याचे कायदेशीर म्हणणे सादर करावे लागणार आहे. आर्थिक व्यवहार का केला ? कशासाठी फोन केला होता याची समर्पक व समाधानकारक उत्तर व त्याच्याशी निगडीत पुरावे दिल्यास चौकशीतुन दिलासा मिळणार आहे मात्र काही संशयास्पद सापडल्यास कारवाई होणार आहे. जे यात गुंतले आहेत व रडारवर आहेत त्यातील काहीजन नॉट रिचेबल झाले आहेत. ड्रग्ज रॅकेट मध्ये 35 आरोपी असुन 21 जन फरार आहेत तर 4 पोलीस कोठडीत व 10 जन जेलमध्ये आहेत.

माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, माजी सभापती शरद जमदडे,तस्कर इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर,प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, उदय शेटे, आबासाहेब गणराज पवार, अलोक शिंदे,अभिजीत गव्हाड, मुंबई येथील संतोष खोत व तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव,दुर्गेश पवार,रणजित पाटील,नाना खुराडे व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 21 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलीस कोठडीतील 4 आरोपी असुन त्यात पुणे येथील सुल्तान उर्फ टिपू शेख व सोलापूर येथील जीवन साळुंके (5 एप्रिल पर्यंत) व राहुल कदम – परमेश्वर (7 एप्रिल पर्यंत) व गजानन हंगरकर (8 एप्रिल पर्यंत) पोलिस कोठडीत आहेत. धाराशिव कारागृहात 10 आरोपी असुन त्यात अमित उर्फ चिमू आरगडे,युवराज दळवी, संदीप राठोड, संगीता गोळे, संतोष खोत, विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे, सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतूराज गाडे, संकेत शिंदे यांचा समावेश आहे. 

तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या 3 आरोपीना 45 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 59 पुड्या ड्रग्जसह 14 फेब्रुवारीला तामलवाडी येथे रंगेहात अटक करण्यात आली. त्यानंतर या 3 आरोपीना ड्रग्ज पुरवठा करणारी मुंबई महिला तस्कर संगीता गोळेला 22 फेब्रुवारी अटक केली तीच्या एका बँकेच्या खात्यावर 5 कोटी व घरातुन पाव किलो सोने जप्त केले. संतोष खोतला 27 फेब्रुवारी,तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याला 28 फेब्रुवारीला अटक करण्यात आली. सोलापूरहुन ड्रग्ज खरेदी करणारे सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतूराज गाडे व संकेत शिंदे या 4 जणांना 18 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 30 पुड्या ड्रग्जसह 4 मार्च रोजी अटक करण्यात आली. पुणे येथील सुल्तान उर्फ टिपू शेख व सोलापूर येथील जीवन साळुंके या दोघांना 23 मार्चला, राहुल कदम-परमेश्वर याला 24 मार्चला अटक केली त्या दिवशी 4 गोपनीय व नवीन 6 अशी 10 जणांची नावे उघड केली. गजानन हंगरकर याला 25 मार्चला अटक केली त्यानंतर पोलिसांनी कोर्टात 26 मार्चला नवीन 10 आरोपींची नावे जाहीर केली. 

पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी बैठक घेत कारवाईचे आदेश दिले. खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी ड्रग्ज प्रकरणी संसद, विधीमंडळात आवाज उठवला. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी 3 वेळेस ड्रग्ज तस्करीबाबत लागणारी माहिती, टीप पोलिसांना दिली त्यामुळे तुळजापुरात वाढत असलेल्या ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड झाला. काही राजकीय पक्षाशी व व्यक्तीशी संबंधित आरोपी असले तरी ते उघड झाल्याने ड्रग्ज तस्करीची कीड नष्ट होईल अशी आशा आहे. पोलिस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम, तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख हे स्वतः यावर लक्ष ठेवुन आहेत. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे सरकारच्या वतीने कोर्टात सक्षम बाजु मांडत आहेत. तामलवाडी पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत. या सर्व टीमच्या तपासामुळे रॅकेटचा भांडाफोड झाला.ड्रग्ज तस्करीत पोलिसांनी 3 वेळेस पोलिसांनी ड्रग्ज जप्त केले, त्यात 63 ग्रॅम वजनाच्या 89 पुड्या होत्या. 

Previous Post

‘आपबिती’,अनेक गौप्यस्फ़ोट – व्यसन लावले नंतर ड्रग्जच्या बदल्यात लैंगिक शोषण, अत्याचार – सेक्स कांडात कोण कोण सहभागी ?

Next Post

24 लाखांची ऑनलाईन फसवणुक – व्हाट्सऍप फाईल पाठवुन डॉउनलोड केली, संस्थेच्या खात्यातील पैसे लुटूले

Related Posts

महाराष्ट्र

सुत्रधार विनोद गंगणे, कोर्टात दावा – 2 गहाळ मोबाईल व पुरावे शोधण्याचे पोलिसांना आव्हान, हे अडचणीचे मुद्दे 

June 7, 2025
महाराष्ट्र

गंगणे ड्रग्ज सेवन करायचे विक्री नव्हे, ते पोलिसांचे खबरी – आरोपीच्या वकिलांचा कोर्टात बचाव

June 7, 2025
महाराष्ट्र

1 आरोपी निष्पन्न, आर्थिक व्यवहाराचे पुरावे – पोलिसांचा कोर्टात दावा, ड्रग्ज तस्करीचा तपास सुरु, अनेक जन रडारवर

June 7, 2025
महाराष्ट्र

गुन्हेगारी कृत्य, पुरावे नष्टचा प्रयत्न – विनोद गंगणे यांचे 2 मोबाईल गहाळ, फरार झाल्यावर मोहोळ येथे गुन्हा नोंद

June 7, 2025
महाराष्ट्र

तुळजापुर ड्रग्ज तस्करी गुन्हा – सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांची महत्वाची भुमिका, पुरावे व कायदेशीर मांडणी

June 7, 2025
महाराष्ट्र

राजकीय दबाव होता का ? तस्कर व सेवन गट वर्गीकरण मुद्दा – कोर्टाचे प्रश्न, तपास अधिकारी अनुत्तरीत

June 7, 2025
Next Post

24 लाखांची ऑनलाईन फसवणुक - व्हाट्सऍप फाईल पाठवुन डॉउनलोड केली, संस्थेच्या खात्यातील पैसे लुटूले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

सुत्रधार विनोद गंगणे, कोर्टात दावा – 2 गहाळ मोबाईल व पुरावे शोधण्याचे पोलिसांना आव्हान, हे अडचणीचे मुद्दे 

June 7, 2025

गंगणे ड्रग्ज सेवन करायचे विक्री नव्हे, ते पोलिसांचे खबरी – आरोपीच्या वकिलांचा कोर्टात बचाव

June 7, 2025

1 आरोपी निष्पन्न, आर्थिक व्यवहाराचे पुरावे – पोलिसांचा कोर्टात दावा, ड्रग्ज तस्करीचा तपास सुरु, अनेक जन रडारवर

June 7, 2025
June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp