Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

गुडी पाडव्यापर्यंत उजनीचे पाणी सिना कोळेगाव धरणात आणणार : मंत्री डॉ तानाजीराव सावंत

समय सारथी by समय सारथी
November 5, 2024
in महाराष्ट्र
0
गुडी पाडव्यापर्यंत उजनीचे पाणी सिना कोळेगाव धरणात आणणार : मंत्री डॉ तानाजीराव सावंत
0
SHARES
8
VIEWS

शेतकर्‍यांना मिळणार दिलासा – 5 वर्षाचे 55 कोटींचे वीज बिल भैरवनाथ कारखाना भरणार

धाराशिव / परंडा – समय सारथी

मराठवाड्याच्या हक्काच्या कृष्णा खोर्‍यातील 7 टीएमसी पाण्याची कामे अंतीम टप्प्यात आली असुन जेऊर बोगद्यासह अन्य ठिकाणची 90 टक्के कामे झाली आहेत, उर्वरीत कामे आगामी काही महिन्यात होणार असुन लिफ्ट एरिगेशन अर्थात उपसा सिंचनाने हे पाणी गुडीपाडव्यापर्यंत येणार आहे. सीनाकोळेगाव सह अन्य भागात हे पाणी येणार असल्यामुळे इथलं दुष्काळाचा प्रश्न कायमचा मिटणार असुन शेतीचे सिंचन क्षेत्र वाढणार आहे. सत्ता बदल झाल्यानंतर आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ  तानाजीराव सावंत यांनी कामांचा प्राधान्यक्रम बदलला त्यामुळे या कामांना गती आली असुन शेतकर्‍यांची गेल्या अनेक वर्षाची स्वप्नपुर्ती होणार आहे.

जेऊर दहिगाव येथील 27 किलोमीटर बोगद्या पैकी 25 किमीचे काम झाले असुन उजनीतून सीना कोळेगाव धरणात हे पाणी टाकणे शक्य होणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि अवर्षणग्रस्त मराठवाड्यासाठी वरदान ठरणार्‍या बहुचर्चित कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी वेळोवेळी मंत्री डॉ सावंत यांनी पाठपुरावा केला होता. या प्रकल्पासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना यश आले असून, या प्रकल्पांचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच प्रकल्पाचे काम पूर्णत्वास येईल असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.या महत्वपूर्ण कामाबद्दल मंत्री सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व महायुती सरकारचे आभार मानले. महायुती सरकारची आणखी एक स्वप्नपुर्ती असुन मंत्री सावंत यांच्या दूरदृष्टीमुळे हे शक्य झाले.

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील पहिला टप्प्यातील कामांना महायुती सरकारने पुढाकार घेत तब्बल 11 हजार 700 कोटी इतका निधी उपलब्ध करून दिला. याबाबतीत प्राधान्यक्रम बदलण्यासाठी मंत्रालयात वेळोवेळी बैठका घेऊन अग्रक्रमाने भूमिका मांडून प्राधान्यक्रम बदलून घेतला त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या योजनेला आता गती मिळाली आहे.
करमाळा तालुक्यातील जेऊर येथून पुढे धाराशिव जिल्ह्यात जाणारा 27 किमी लांबीचा हा बोगदा असून, आता जवळपास 25 किमी पर्यंतचे काम हे पूर्ण झाले आहे. येत्या काही महिन्यातच उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर उजनीतील पाणी सीना- कोळगाव धरणात यशस्वीरीत्या सोडणे शक्य होणार आहे. तब्बल 7 टीएमसी इतके पाणी या बोगद्याच्या माध्यमातून सीना कोळेगाव धरणात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पाणी प्रश्न कायमचा मिटणार असून, गेले अनेक वर्ष दुष्काळाच्या झळा सोसलेल्या शेतकरी बांधवांच्या शेतीला या प्रकल्पामुळे नवसंजीवनी मिळणार आहे.

उजनीचे पाणी सीना कोळेगाव या भागात आल्यावर शेतकर्‍यांसाठी उपसा सिंचन समिती स्थापन करुन शेतकर्‍यांना पाणी आल्यापासुन 5 वर्ष काळात येणारे प्रतीवर्ष 11 कोटी प्रमाणे 5 वर्षाचे 55 कोटी वीजबील भैरवनाथ साखर कारखाना भरणार असल्याचे मंत्री सावंत यांनी जाहीर केले. पाणी आले म्हणजे समस्या सुटली असे नाही. तलावापासुन 5 ते 10 किलोमीटर अतंरावर लांब शेती असलेल्या शेतकर्‍यासाठी उपसा सिंचन समित्या स्थापण करून पाणी शेतकर्‍यांच्या बांधावर पोहचवणार आहे. उजनीचे पाणी आल्यावर या भागात सिंचनाचे क्षेत्र वाढणार असुन हरितक्रांतीच्या माध्यमातून शेतकरी समृद्ध होणार आहे.या घोषणेमु़ळे शेतकर्‍यांचा विजबिलाचा ताण कममी होणार असून त्यांना फायदा होणार आहे.

शेतकर्‍यांना आवाहन, जमिनी विकु नका 

पाणी आल्यानंतर सिंचन क्षेत्र वाढणार असून शेतकर्‍यांची आर्थिक प्रगती होणार आहे. अनेक वेळा शेतकरी दहा एकर पैकी एखादी एकर शेती ही पाईपलाईन, विहीर व इतर कामासाठी पैशाची गरज म्हणून विकतात. योग्य वेळी अशा गरजू शेतकर्‍यांना आर्थिक मदत भैरवनाच्या माध्यमातून करू मात्र शेती विकू नका, असे आव्हान सावंत यांनी केले आहे. भैरवनाथ उद्योग समुह शेतकर्‍यांच्या नेहमीच पाठीशी राहिला असून शेतकऱ्यांना यावेळीही मदत केली जाणार आहे.

Previous Post

वाद मिटला – गाव तिथे स्मशानभुमी व दफनभुमी, अखेरचा प्रवास तंटामुक्त

Next Post

दृष्टीदाता, संकल्पपुर्ती – आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंतांमुळे रुग्णांना मिळाली दृष्टी

Related Posts

महाराष्ट्र

राजाभाऊ पवार यांनी घेतले डॉ पद्मसिंह पाटीलांचे आशीर्वाद – भाजपच्या वाटेवर शिक्कामोर्तब

August 27, 2026
महाराष्ट्र

1 कोटींचा गद्दार – धाराशिव शहरात बॅनर बाजी, पक्षांतर, भाजपने लावले बॅनर

August 27, 2026
महाराष्ट्र

ऑपरेशन टायगर – 4 नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते प्रवेश, धाराशिव नगर परिषदेत सत्ताकारण

August 27, 2026
महाराष्ट्र

ठरलं – ठाकरे गटाचे नगरसेवक शिंदे गटात जाणार, ऑपरेशन ‘टायगर’

August 26, 2026
महाराष्ट्र

श्री तुळजाभवानी मंदिराला MSF चे सुरक्षा कवच – अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या भाविकाभिमुख सेवेसाठी सूचना

August 25, 2026
महाराष्ट्र

निलंबन – महावितरण अधीक्षक अभियंता आडे यांच्यावर कारवाई

August 25, 2026
Next Post
दृष्टीदाता, संकल्पपुर्ती – आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंतांमुळे रुग्णांना मिळाली दृष्टी

दृष्टीदाता, संकल्पपुर्ती - आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंतांमुळे रुग्णांना मिळाली दृष्टी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

राजाभाऊ पवार यांनी घेतले डॉ पद्मसिंह पाटीलांचे आशीर्वाद – भाजपच्या वाटेवर शिक्कामोर्तब

August 27, 2026

1 कोटींचा गद्दार – धाराशिव शहरात बॅनर बाजी, पक्षांतर, भाजपने लावले बॅनर

August 27, 2026

ऑपरेशन टायगर – 4 नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते प्रवेश, धाराशिव नगर परिषदेत सत्ताकारण

August 27, 2026
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp