तुळजापूर – समय सारथी
तुळजापूर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे भाजप उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या कार्याची माहिती देणारे गाणे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिलीज झाले आहे. नेता हा जनतेचा जनसेवेसाठी समाजकार्यासाठी सदैव तत्पर आपल्यासाठी.. वाजणार पण, गाजणार पण अश्या आशयचे गाणे लोकप्रिय गायक आदर्श शिंदे यांनी आपल्या खास आवाजात व शैलीत गायले आहे. सध्या हे गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असुन गाणं वाजू द्या असे म्हणत कार्यकर्ते व्हायरल करीत आहेत. निवडणुकीत हे गाणे आमदार पाटील यांचे प्रचारगीत असणार आहे.
केलं न जे कोणी ते करुन दाखवलं आणि पाणी उजनीच हे आणुन दाखवलं.. आई भवानी पाठीशी हाय, दादांना आपल्या तोडच नाय.. नेता हा जनतेचा.. राणा दादा.. हात मदतीचा, वाली जनतेचा पाठी उभा राणादादा अशी या गाण्याची सुरुवात आहे. धाराशिव रेल्वे स्थानक, तुळजापुरात रेल्वे आणली. 1 हजार 999 कोटींचा तुळजापूर मंदीर विकास आराखडा मंजुर केला असुन त्यात प्रशस्त मंदीर परिसर, सुसज्ज व्यवस्था,भव्य विकास आराखडा मंजुर केला. वचनाचा पक्का, खरा शिलवान.. विद्वान, बुद्धीवान,वाली जनतेचा.. असे हे गाणे असुन यात त्यांनी केलेल्या कामाची चित्र व व्हिडीओ स्वरूपात माहिती सांगितली आहे.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या वरील गाणं प्रसिद्ध – विकास कामांचा आढावा, ही कामे केली
व्हिडीओ गाणं –