धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील भुम परंडा विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवारी बाबत अजूनही संभ्रम व गोंधळ आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा गटाने राज्यातील 65 उमेदवार यांची यादी जाहीर केली त्यात परंडा मतदार संघातून राहुल ज्ञानेश्वर पाटील यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर केले. नावात चुक झाली आहे हे मात्र नक्की. राहुल ऐवजी रणजित ज्ञानेश्वर पाटील असे आहे असे म्हणत शिवसेना उबाठा गटाने आनंद उत्सव साजरा केला आहे तर राहुल मोटे यांनी त्यांच्या कार्यकर्ते यांना सबुरीचा सल्ला दिला आहे.
महाविकास आघाडीचे सर्व जेष्ठ नेते बैठकीच्या माध्यमातून तिकीट वाटप संदर्भात योग्य तो तोडगा काढत आहेत. सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की आपण कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमाद्वारे दिल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी असे आवाहन राहुल मोटे यांनी केले आहे.
नावात चुक झाल्याने मोठा संभ्रम गोंधळ उडाला असुन उद्या याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. शिवसेना उबाठा गटाला उमेदवारी बदलायची नामुष्की येणार का ? हे उद्या स्पष्ट होणार आहे.