Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

धाराशिव विधानसभा निवडणुकीचे 1962 ते 2019 पर्यंतचे चित्र, पक्षनिहाय समीकरण 

समय सारथी by समय सारथी
October 24, 2024
in महाराष्ट्र
0
0
SHARES
828
VIEWS

धाराशिव – समय सारथी 

धाराशिव जिल्ह्यातील उस्मानाबाद, परंडा, तुळजापूर व उमरगा या 4 विधानसभा मतदार संघासाठी निवडणुक होत असुन यावर्षी 2024 मध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी सरळ लढत होताना दिसत आहे. महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट व इतर घटक पक्ष आहेत तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उबाठा व इतर पक्ष आहेत. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप हे लढले त्यावेळी धाराशिव मतदार संघातील 4 पैकी 3 ही जागा ह्या शिवसेनेला मिळाल्या तर एक जागा भाजपला मिळाली.

धाराशिव जिल्ह्यात 2004 च्या पूर्वी 5 विधानसभा मतदार संघ होते. मात्र, त्यानंतर मतदार संघ पुनर्रचनेत कळंब मतदार संघ कमी होऊन उस्मानाबाद,तुळजापूर,परांडा व उमरगा हे 4 मतदार संघ झाले. धाराशिव मतदार संघातून शिवसेना कैलास घाडगे पाटील, तुळजापूर मतदार संघ भाजपकडुन राणाजगजीतसिंह पाटील, परंडा येथून प्रा डॉ तानाजीराव सावंत व उमरगा येथून ज्ञानराज चौगुले हे निवडून आले. सत्ता परिवर्तन वेळी शिवसेना पक्ष फुटला त्यात आमदार चौगुले व डॉ सावंत हे शिंदे गटात गेले तर कैलास पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले. 

उस्मानाबाद विधानसभा मतदार हा डॉ पद्मसिंह पाटील यांचा बालेकिल्ला मानला जात होता, जिल्ह्यात ते सर्वाधिक 7 वेळेस आमदार म्हणून निवडून आले . 2009 ची निवडणूक ओमराजे निंबाळकर वगळता त्यांच्या सत्ता साम्राज्याला एकाही नेत्याने किंवा पक्षाने सुरुंग लावलेला नाही. डॉ पद्मसिंह पाटील यांनी मीच ‘किंग’ आहे हे नेहमी या मतदार संघातून दाखवून दिले आहे .1978 साली डॉ पद्मसिंह पाटील पहिल्यांदा काँग्रेस अर्स पक्षाकडून आमदार झाले आणि त्यानंतर त्यांची विजयी घोडदौड 2009 च्या निवडणुकीपर्यंत सुरूच राहिली. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत डॉ पाटील यांचे पुत्र आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा ओमराजे निंबाळकर यांनी पराभव केला मात्र राणाजगजीतसिंह पाटील यांनी त्याचा वचपा 2014 च्या निवडणुकीत काढला व ओमराजे यांचा 10 हजार 806 मतांनी पराभव केला त्यानंतर राणाजगजीत पाटील यांनी 2019 ला राष्ट्रवादी पक्ष बदलून भाजपात प्रवेश करुन तुळजापूर विधानसभा मतदार संघात विजय मिळविली. धाराशिव विधानसभा मतदार संघात कैलास पाटील यांनी 2019 साली विजय मिळवून त्यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीचा श्रीगणेशा केला.

तुळजापूर मतदार हा सुरुवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. 1978 व 1985 ची निवडणूक शेकापच्या माणिकराव खपले यांनी जिंकली. मात्र, उर्वरित काळात येथे काँग्रेसचे वर्चस्व राहिले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार मधुकरराव चव्हाण 1990 साली पहिल्यांदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून आमदार झाले. त्यानंतर 1999 ते 2014 पर्यंतच्या 20 वर्षाच्या काळात ते कायम आमदार राहिले. 2019 च्या निवडणुकीच्या आखाड्यात ते पराभूत झाले. मधुकरराव चव्हाण हे 25 वर्ष आमदार राहिले व ते काँग्रेस सरकारच्या काळात पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्रीही राहिले. तुळजापूर मतदार संघ जणू आमदार चव्हाण यांचे संस्थान बनले होते मात्र भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी त्यांचा पराभव केला. 

परंडा मतदार संघात वासुदेवराव देशमुख हे आरपीआय व जनता पक्षाच्या तर ज्ञानेश्वर पाटील हे शिवसेनेच्या माध्यमातून 10 वर्ष आमदार झाले. तर महारुद बप्पा मोटे 2 वेळेस व त्यांचे पुत्र राहुल मोटे हे विजयाची हॅट्रिक करीत सलग 3 वेळेस आमदार राहिले. मोटे परिवाराकडे या मतदार संघात तब्बल 25 वर्ष सत्ता राहिली त्यामुळे त्यांच्यासाठी हा मतदार संघ बालेकिल्ला बनला होता मात्र सलग 3 वेळेस विजयाची हॅट्रिक करणाऱ्या मोटे यांचा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी पराभव केला. त्यांनी 32 हजार 902 विक्रमी मतांनी विजय मिळविला. 

उमरगा मतदार संघात सुरुवातीची 20 वर्ष चालुक्य परिवाराची सत्ता होती. भास्करराव चालुक्य काँग्रेस आयकडून सलग 3 वेळेस तर विजयसिंह चालुक्य एक वेळेस शेकापकडून आमदार राहिले. 1995 ला काँग्रेसचा हा बालेकिल्ला शिवसेनेचे रवींद्र गायकवाड यांनी काबीज केला. 1999 ला काँग्रेसचे आमदार बसवराज पाटील यांनी विजय मिळविल्यानंतर 2004 ला पुन्हा रवींद्र गायकवाड आमदार झाले व त्यानंतर खासदार. 2009 पासून सलग 3 टर्म शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले आमदार आहेत. गायकवाड व चौगुले या गुरु शिष्याच्या जोडीने या मतदार संघात 25 वर्ष सत्ता उपभोगली आहे त्यामुळे हा मतदार संघ शिवसेनेचा हक्काचा बनला.

Previous Post

उमेदवारी जाहीर होताच आमदार कैलास पाटील यांनी मानले आभार – प्रामाणिकपणे काम करणार 

Next Post

डॉ पाटील पद्म’सिंह’ च – सर्वाधिक 7 वेळेस आमदार तर 37,939 मतांनी विजयी होण्याचा विक्रम

Related Posts

महाराष्ट्र

धनंजय सावंत भाजप सोबत – मल्हार पाटील यांची भेट, विक्रमी बहुमत

February 17, 2026
महाराष्ट्र

गांजा लागवड – 73 लाखांचा 146 किलो गांजा जप्त – धाराशिव जिल्ह्यात कारवाई

February 16, 2026
महाराष्ट्र

हत्याकांड – खुन प्रकरणात कला केंद्रावरील नर्तिका व इतर चौकशीच्या फेऱ्यात, पोलिसांचा तपास सुरु

February 16, 2026
महाराष्ट्र

जय पराजय होत असतो, सगळ्यांनी मदत केली, आम्ही एकत्र – चालुक्य यांनी आरोप फेटाळले

February 16, 2026
महाराष्ट्र

बदनामीचे षडयंत्र, हिम्मत असेल तर स्वतः बोला – आमदार पाटील यांना आव्हान

February 16, 2026
महाराष्ट्र

शिवसेनेत घुसखोर, अनेक जन बुजगावणे – दुष्काळी व दळभद्री मानसिकता – अविनाश खापेंचा आरोप

February 16, 2026
Next Post
डॉ पाटील पद्म’सिंह’ च – सर्वाधिक 7 वेळेस आमदार तर 37,939 मतांनी विजयी होण्याचा विक्रम

डॉ पाटील पद्म'सिंह' च - सर्वाधिक 7 वेळेस आमदार तर 37,939 मतांनी विजयी होण्याचा विक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

धनंजय सावंत भाजप सोबत – मल्हार पाटील यांची भेट, विक्रमी बहुमत

February 17, 2026

गांजा लागवड – 73 लाखांचा 146 किलो गांजा जप्त – धाराशिव जिल्ह्यात कारवाई

February 16, 2026

हत्याकांड – खुन प्रकरणात कला केंद्रावरील नर्तिका व इतर चौकशीच्या फेऱ्यात, पोलिसांचा तपास सुरु

February 16, 2026
February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp