धाराशिव – समय सारथी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 29 ऑगस्ट रोजीचा धाराशिव जिल्हा दौरा रद्द झाला आहे, मुख्यमंत्री यांचे खासगी सचिव तथा राज्य मुख्य समन्व्यक डॉ अमोल शिंदे यांनी याबाबतचे पत्र काढले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशिव जिल्ह्यात येणार होते मात्र त्यांच्या दौऱ्याची तयारी व्यवस्थित न झाल्याने तो रद्द करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री शिंदे हे परंडा येथे महिला सक्षमीकरण अंतर्गत 30-40 हजार महिलांचा भव्य मेळावा घेणार होते शिवाय ते नमो महारोजगार मेळाव्यास उपस्थितीत राहणार होते. राजकीय समन्वयाचा अभाव, पर्याप्त तयारी नसल्याने हा दौरा रद्द झाला आहे. दौरा रद्द बाबत शिवसेनेचे स्थानिक नेते मात्र बोलायला तयार नाही.