उमरगा – समय सारथी
उमरगा शहरात एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. शहरातील एका गल्लीत आपल्या आईसोबत आजोळी आलेल्या चार वर्षीय चिमुकलीला पैशाचे आमिष दाखवून एका परप्रांतीय 52 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे लहान मुलीसुद्धा असुरक्षित असल्याचे पुन्हा समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका गल्लीत आपल्या आईसोबत चार वर्षीय चिमुकली आजोळी आली होती. शनिवारी रात्री आई घरी स्वयंपाक करत असताना चिमुकली घराबाहेर भावंडांबरोबर खेळत होती. दरम्यान कर्नाटकातील अनिल देवेंद्र कांबळे रा बसवकल्याण (जि बिदर) याने चिमुकलीला पैशांचे आमिष दाखवून घराजवळून तिला खांद्यावर उचलून घेतले आणि कोरेगाव रोड लगत असलेल्या एका वेल्डींगच्या दुकाना समोरील लोखंडी टपरीच्या आडोशाला नेत बलात्कार केला. घडलेली घटना महिला व नागरिकांना समजताच चिमुकली सोबतचा पुढील मोठा अनर्थ टळला. तर या घटनेची माहिती मिळताच उमरगा पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी संतप्त जमावाच्या मारहाणीत जखमी आरोपीला ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेत नागरिक व पोलीसांनी वेळीच सतर्कता दाखवल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी उमरगा पोलिसांत पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अनिल कांबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अनुसया माने या करीत आहेत.
पिडीत मुलीची आई स्वयंपाक करून घराबाहेर आली असता चिमुकली नजरेस पडली नाही. त्यामुळे तिने सर्वत्र शोधाशोध केली. शेवटी कोरेगाव रोड लगत असलेल्या एका वेल्डींगच्या दुकाना समोरील लोखंडी टपरीच्या आडोशाला तिच्यावर अत्याचार झाल्याचे निदर्शनास आले. दरम्यान यातील आरोपीला संतप्त जमावाने चांगलाच चोप दिला. यातील जखमी आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कर्नाटकातील बसवकल्याण येथील अनिल कांबळे रहिवासी आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो उमरगा लातूर मार्गावरील एका ढाब्यावर कामाला आहे. शहर व परिसरात परराज्यातील अनिल याच्यासारखे अनेकजण बियर बार, हाँटेल, ढाबे, लाॅज, हातगाडीवर अवैधरित्या राहत आहेत. अनेकांकडे कसलेही ओळखपत्र नाहीत. भविष्यात अशा व्यक्ती एखादा गुन्हा करून पसार झाल्यास पोलीसाना त्याना शोधून काढण्यात अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत आहे. त्याकरिता अवैधरित्या वास्तव्यास असलेले मंजूर व कामगारांची माहिती घेणं आवश्यक असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.