धाराशिव – समय सारथी
हैद्राबाद गॅझेटमधील मराठा व कुणबी या नोंदी तपासण्याचे काम पुर्ण झाले असुन 11 अधिकारी यांच्या पथकाने 6 हजार 200 कागदपत्रे स्कॅन करुन ताब्यात घेतली आहेत. अधिकारी यांचे हे पथक हैद्राबादवरून परत निघाले आहे. या पथकात भाषांतरकार, कायदे तज्ज्ञ यांचा समावेश होता त्यांनी सन 1800, 1820 व 1900 या वर्षातील जनगणना नोंदी तपासल्या. त्यात मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जातीनिहाय नोंदी आहेत, ही कागदपत्रे राज्याचे महाधिवक्ता यांच्याकडे देण्यात येणार आहेत. 1901 च्या जनगणनेनुसार धाराशिव जिल्ह्यात त्यावेळी 2 लाख लोक कुणबी होते.
मराठा व कुणबी हे एकच असुन सरकारने हैद्राबाद गॅझेट स्वीकारावे आणि मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे अशी मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे,त्यासाठी त्यांनी सरकारला 13 जुलैची डेडलाईन दिली असुन त्यांनी मराठा जनजागृती व शांतता रॅली सुरु केली आहे. हैद्राबाद गॅझेटमध्ये मराठा व कुणबी एक असल्याच्या नोंदी असल्याने ते गॅझेट स्वीकारावे अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.
हैद्राबाद गॅझेटचा सरकारने शोध सुरु केला होता त्यासाठी महाराष्ट्र सरकारने तीन पत्र हैद्राबादच्या मुख्य सचिवांना देत पत्रव्यवहार केला असुन ऑफिशियल कॉपी मागितली मात्र त्याला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने 11 अधिकारी यांची टीम 8 जुलै रोजी हैद्राबाद येथे गेली त्यांनी त्यांचे कामकाज संपविले. कागदपत्रे छानणी करुन सरकारला तात्काळ अहवाल दिला जाणार आहे.
1901 सालीच्या गॅझेटमध्ये धाराशिव जिल्ह्यात 2 लाख मराठा कुणबी लोकसंख्या असल्याच्या नोंदी आहेत. ब्रिटिश यांच्या इम्पेरियर गॅझेटीयरमध्ये पान क्रमांक 262 व 263 वर जात व व्यवसाय या परिच्छेदात The Most Numerous Caste is that of the Kunbis (Maratha) who number 2 lakh 5 thousand or 38 % Of the Total Population. ही महत्वाची नोंद सापडली आहे. गुलबर्गा विभागात धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, कळंब, तुळजापूर, परंडा हे सध्याचे तालुके व तत्कालीन नळदुर्ग तालुका व औसा हा भाग होता.त्यवेळी 6 शहरे व 860 गावे होती त्यात 1901 साली 5 लाख 35 हजार लोकसंख्या होती, 58 टक्के लोकांचा व्यवसाय हा शेती होता. कुणबी म्हणजे मराठा अशी महत्वाची नोंद सापडली आहे