धाराशिव – समय सारथी
Elizabeth jerord या नावाचे फेसबुक धारक, मोबाईल 7039344186 चा धारक, इंडिया ओव्हरसीएस बॅक खाते 231101000004304 चा धारक, आय. सी. आय.सी. आय बॅक खाते क्र 34420508352 , कॅनरा बॅक खाते क्र 110136163669, व्हॉटसअप नं 2217676305 चा धारक यांनी बेंबळी येथे कार्यरत असलेले शिक्षकास वेळोवेळी संपर्क साधुन त्यांना भारतात शैक्षणिक क्षेत्रात गुंतवणुक करावयाची आहे त्यासाठी त्यांचेकडील युएस डॉलर पाठविले आहेत. डॉलर भारतात सोडवून घेण्यासाठी वेगवेगळे टॅक्सचे नावाखाली 29 फेब्रुवारी 2024 ते 16 जुन 2024 या काळात 45 लाख 90 हजार विविध बॅक खात्यामध्ये भरण्यास सांगितले. त्याबदल्यात फिर्यादीस रक्कम परत न करता शिक्षकाची ऑनलाईन पद्धतीने आर्थिक फसवणुक केली. बेंबळी येथे कार्यरत असलेले शिक्षक यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन सायबर पो ठाणे येथे भादवि कलम 420, सह माहिती तंत्रज्ञान सुधारीत अधिनियम 2008 कलम 66 सी, 66 डी अन्वये गुन्हा नोंदवला आहे