धाराशिव – समय सारथी
येत्या 15 दिवसात धाराशिव जिल्ह्यात बैठकांचा धडाका असणार आहे. पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली 8 जानेवारीला जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे तर 16 जानेवारीला खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेत दिशा समितीची बैठक होणार आहे.
पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत हे 8 ते 10 जानेवारी दरम्यान 3 दिवसांच्या दौऱ्यावर असुन 8 जानेवारी नियोजन समितीची बैठक तर 9 जानेवारी रोजी विविध विकास कामाचे व कार्यक्रम असुन 10 जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशिव येथे असुन पक्ष मेळावा होणार आहे.