धाराशिव – समय सारथी
धाराशिव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या गाडीची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली आहे. पंचायत समिती कार्यालयाच्या पुढे उभे असलेल्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने येऊन दगडफेक करत गाडीची काचा व इतर वस्तूची मोडतोड केली आहे.
ही दगडफेक नेमके कोणत्या कारणावरून केली ? का केली ? याबाबत पंचायत समितीतील अधिकारी बोलत नसून नेमकी घटना का घडली हे सांगत नाहीत. ही घटना पंचायत समितीतील पार्किंगच्या वादातून झाल्याची चर्चा मात्र पंचायत समिती आवारात रंगली आहे
दरम्यान गाड्यांची तोडफोड होऊन अनेक तास उलटले तरी पोलिसात मात्र याबाबत कुठलीच तक्रार दिली गेली नसल्याने नेमकी घटना घडली की घडवली याबाबत ही चर्चा रंगली आहे.