प्रशासन सज्ज, नागरिकांनी काळजी घ्यावी – जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे आवाहन
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा एकदा शिरकाव झाला असुन तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाई या गावात हा रुग्ण सापडला असल्याची माहिती असुन प्रशासन सज्ज असुन नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
14 वर्षीय हा रुग्ण हिप्परगा येथील शाळेत असुन त्याला गेल्या 3 दिवसापासून ताप होता त्यानंतर त्याला खोकला सुरु झाल्याने तपासणी करण्यात आली त्यानंतर कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. या मुलाची आई गेल्या 10 दिवसापूर्वी मुंबई येथून आली होती आईला कोणतीही लक्षणे सध्या नाहीत, कोरोनाच्या जे एन 1 चा शिरकाव झाला आहे. या मुलाला तुळजापूर येथील उप जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले असुन त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ इस्माईल मुल्ला यांनी दिली. या मुलाची तब्येत बरी आहे.
कोरोनाच्या या नवीन व्हेरियंट हा तुलनेत जास्त घातकी नसून त्याचा प्रसार मात्र वेगाने आहे.